‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाच्या माध्यमातून ‘सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar)’ यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल विमल मोढले यांनी केले असून येत्या २ फेब्रुवारीला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं नावचं फिल्मी नाही तर याचं कथानकही खूप फिल्मी आहे. टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या रिस्पॉन्सने बोल्ड ब्युटीफुल सई व चॉकलेट बॉय सिद्धार्थ यांचा चित्रपट पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे. तसेच सई व सिद्धार्थची केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
या चित्रपटामध्ये सई आणि सिद्धार्थ सोबत जय मोने, शुभांगी गोखले, समीर खांडेकर, रसिका सुनील, वंदना सरदेसाई, पूजा वानखेडे, रमाकांत डायमा, सुलभा आर्या, पल्लवी परांजपे, सिद्धार्थ महाशब्दे, सिद्धार्थ बोडके, जियांश पराडे यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. तसेच श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटातील ‘दिल मैं बजी गिटार’ हे गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं असून गाण्याच्या शेवटच्या कडव्यात श्रेयस तळपदेची एंट्री दाखवली आहे. तब्बल सोळा वर्षांनी श्रेयस आणि सई पुन्हा एकदा एकत्र दिसत आहेत. चित्रपटातील गाण्याच्या निम्मिताने त्या दोघांची जुगलबंदी पुन्हा एकदा पाहायला मिळणार म्हणून त्यांचे चाहते भलतेच खुश दिसत आहेत.
दरम्यान, २००६ मध्ये बॉलिवूडचा प्रदर्शित झालेला ‘अपना सपना मनी मनी’ या चित्रपटात श्रेयस तळपदे आणि रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका होती तसेच या चित्रपटातील ‘गिटार सॉंग’चं हे मराठी व्हर्जन बनवण्यात आले आहे. आन्दाची बातमी म्हणजे या गाण्याच्या मराठी व्हर्जनमध्ये देखील प्रेक्षकांना श्रेयसची झलक पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
तसेच श्रेयसने त्याच्या सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत अठरा वर्षांनी पुन्हा एकदा ह्या गाण्याचा एक भाग घेऊन आल्याबद्दल चित्रपटाच्या टीमचे आभार मानले. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत कौतुकाच वर्षाव केला आहे. तर त्याच्या एका फॅनने चक्क श्रेयस तू मराठीतील विजय थलापती आहेस अशी कमेंट केली. त्यावर रिप्लाय देत श्रेयस म्हणाला की, “बापरे! मित्रा…धन्यवाद, तुझे खूप आभार पण, मी श्रेयस म्हणूनच ठिक आहे रे”
चित्रपटाच्या कथानकाला ‘श्रीदेवी प्रसन्न’तून दिलेला फिल्मी तडका रसिक प्रेक्षकांचे १०० टक्के मनोरंजन करणार यात शंकाच नाही.