गेले अनेक दिवस बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू चर्चेचा विषय बनली आहे. आणि त्याच कारण म्हणजे तापसीचं लग्न. तापसी पन्नू गेले १० वर्ष मॅथियस बोला डेट करत आहे. मॅथियस हा एक माजी बॅडमिंटनपटू आहे. तसेच सध्या तो इंडियन बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक आहे. मॅथियस आणि तापसी यांनी कधीच आपलं नात जगापासून लपवलं नव्हत, पण ते दोघेही नेहमीच लाईमलाईट पासून दूर असतात.
सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक जण लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच गेल्या अनेक दिवसापासून तापसी आणि मॅथियस यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. पण या दोघांपैकी एकाने पण कधीच उघडपणे यावर भाष्य केलं नाही. काही दिवसांपूर्वी हे दोघेही मार्चमध्ये लग्न करणार आहेत असं समोर आलं होत. पण दोघांनी पण यावर अधिकृत घोषणा केली नव्हती. पण आता या दोघांनी दोन दिवसांपूर्वी उदयपुरमध्ये अगदी कमी लोकांच्या उपस्थित लग्नगाठ बांधल्याचं समोर आलं आहे. आणि त्याच कारण म्हणजे तापसीचा खूप चांगला मित्र आणि थप्पड या सिनेमातील तापसीचा सहकलाकार पावेल गुलाटी याने लग्नातले काही फोटो शेअर केले आहेत. पण या फोटोंमध्ये कुठेच तापसी आणि मॅथियस दिसत नाहीयेत. पण तापसीची बहिण शगुन पन्नू आणि त्यांचे अगदी जवळचे मित्र, तसेच मॅथियस याचे काही बॅडमिंटन क्षेत्रातील मित्र या फोटो मध्ये दिसत आहेत.
तसेच तापसीच्या बहिणीने म्हणजेच शगुन पन्नू हिने तिच्या सोशल मीडियावर काही हळदीचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये देखील तापसीचे अगदीच जवळचे मित्र दिसून येत आहेत. तापसीची जवळची मैत्रीण कनिका धिलोन ही देखील यावेळी उपस्थित होती. कनिकाने तापसीच्या ‘हसीन दिलरुबा’ या सिनेमाचे लेखन केले आहे. बॉलिवूड मधून फक्त अनुराग कश्यप यांना आमंत्रण होत. कनिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुराग कश्यप देखील दिसून आले. या दोघांचे लग्न जयपूर इथे झाल्याचं समोर आलं आहे. तसेच या दोघांनी पण लग्नानंतर होळी खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत. आपली पर्सनल लाईफ आणि मिडिया यावर तापसी अनेकदा बोलताना दिसून येते. पर्सनल लाईफच्या बाबतीत मिडियापासून लांब राहणाऱ्या तापसीने गुपचूप लग्न उरकल्याने याची अधिकृत घोषणा कधी करणार यावर साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.