मराठी सिनेसृष्टीचे अत्यंत लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. ते नेहमीच त्यांच्या हटक्या अंदाजात व मराठी मातीला साजेसे सिनेमे प्रदर्शित करत असतात. त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना देखील मनापासून आवडतात. एवढेच नाही तर बॉलिवूडचा फेमस अभिनेता आयुष्मान खुराना याला देखील नागराज मंजुळे यांचे चित्रपट पाहायला आवडतात.
अभिनेता आयुष्मान खुराना याने एका मुलाखतीमध्ये सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या विषयी भाष्य केले आहे. आयुष्मान खुराना याने ‘एबीपी माझा’च्या कार्यक्रमात अस म्हटलंय की, ‘सध्याचा काळ हा कलाकार होणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. तुम्ही कोणत्याही शहरातून, गावातून या.. अगदी तुमचं या क्षेत्रात कोणीही नसेल तरी तुम्ही इथे करिअर करु शकता. कारण तुमच्यात टॅलेंट असेल तर ते टॅलेंट लपून राहात नाही. तुम्हाला संधी नक्कीच मिळेल.
जेव्हा त्याला मराठी चित्रपटांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “मी मराठी चित्रपट आवर्जून पाहतो. नागराज मंजुळेचे चित्रपट मला विशेष आवडतात. हे चित्रपट मातीशी जोडलेले असतात. ते आपल्या समाजावर भाष्य करत असतात. नागराज यांचे चित्रपट असेच असल्याने मला ते आवडतात. मला मराठी सगळं समजतं पण बोलता येत नाही.
विकी डोनर या सिनेमा पासून त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवास सुरु झाला असून, तो नेहमीच त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतो. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असूनही प्रेक्षकांना तो आपलासा वाटतो. त्याच सुंदर अभिनय, गायनाचे कौशल्य हे प्रक्षकांना अतिशय आवडते. त्याने बॉलिवूडमध्ये स्वत:च वेगळ स्थान निर्माण केले आहे. नव्या पिढीच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचं नाव अग्रक्रमानं घेतल जाते.
सिनेसृष्टीत येण्याआधी त्याने जे काही स्ट्रगल केले आहे त्याविषयी त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. तो म्हणाला, ‘मला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं. पण तेव्हा तसं वातावरण घरात नव्हतं. मग मी कॉलेजमध्ये असताना नाटकातून सुरुवात केली. मी ‘आयएपीएल’ देखील होस्ट केलं आहे, मी क्रिकेट पण खेळलो आहे, हे खूप कमी लोकांना माहित असेल.”
”काही काळानंतर मुंबईमध्ये मी स्थिरवलो. मी पत्रकार म्हणून अनेकांच्या मुलाखतीदेखील घेतल्या आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मी एकच विचार केला की, माझा पहिला चित्रपट चांगला असायला हवा. मी ‘विकी डोनर’च्या आधी सहा चित्रपटांना नकार दिला होता.’ असं आयुष्यमान यावेळी म्हणाला.