बॉलिवूड मधील अत्यंत रोमँटिक व लोकप्रिय जोडी म्हणजेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची आहे. ते दोघेही नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांमुळे सोशल मिडीयावर चर्चेत असतात. त्यांचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. ते बॉलिवूडचे स्टार कपल म्हणून देखील ओळखले जातात.
काही दिवसांपूर्वीच रणबीर व श्रद्धा कपूरचा ‘तू झुठी मै मक्कार’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. चित्रपटामध्ये रणबीर व श्रद्धा मुख्य भूमिकेत होते. आलिया देखील लवकरच करण जौहरच्या ‘रॉकी और राणी कि प्रेम कहाणी’ या रोमँटिक व कॉमेडी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटामध्ये आलिया सोबत रणवीर सिंह देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.
रणबीर व आलिया गेल्यावर्षी १४ एप्रिल २०२२ मध्ये लग्न बंधनात अडकले लग्नाच्या काही महिन्यातच आलियाने एका गोड मुलीला जन्म दिला. त्यांनी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस देखील त्यांची मुलगी ‘राहा’ सोबत साजरा केला.
आलियाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिने तिच्या नवऱ्या बद्दल म्हणजेच रणबीर बद्दल काही खुलासे केले आहेत. या मुलाखतीमध्ये आलियाला असा प्रश्न विचारण्यात आला की, रणबीरकडे अशी कोणती गोष्ट आहे ज्याचा तुला हेवा वाटतो? त्या प्रश्नावर तिने अत्यंत प्रामाणिकपणे उत्तर दिले आलिया म्हणते “रणबीरचा स्वभाव अत्यंत शांत असून तो संत प्रवृत्तीचा माणूस आहे. तो शांत डोक्याने विचार करतो या गोष्टीचा मला खूप हेवा वाटतो.”
या मुलाखतीमध्ये तिने तिच्या स्वभावा विषयी देखील काही गोष्टी सांगितल्या आहेत. तिच्या बद्दल सांगताना आलिया म्हणाली की, “मी जेव्हा भडकते आणि मोठ्या आवाजात बोलते किंवा चिडचिड करते, या गोष्टी रणबीरला अजिबात आवडत नाहीत.” रणबीरला या गोष्टी आवडत नसल्याने, मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते, असे आलियाने मुलाखतीमध्ये सांगितले आहे.