Tiger Shroff आणि Amitabh Bachchan ‘गणपत’ मध्ये येणार एकत्र
ज्याच्या फक्त एका लूकने लाखो मुली घायाळ होतात असा बॉलिवूडचा अभिनेता Tiger Shroff. Tiger Shroff ने आतापर्यंत बाघी, हिरोपंती, वॉर यांसारख्या अनेक सिनेमांमधून सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
तसेच टायगरच्या डॅशिंग बॉडी मुळे असंख्य तरुणी त्याच्या चाहत्या आहेत. तर या डॅशिंग अभिनेत्याचा नवाकोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Tiger हा त्याच्या ‘गणपत’ या आगामी सिनेमासाठी चांगलाच चर्चेत आला आहे.
Tiger Shroff ने नुकतच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून गणपत या सिनेमाची छोटीशी झलक त्याच्या चाहत्यांना दाखवली आहे. त्यातील Tiger च्या धमाकेदार एंट्रीने इंटरनेटचा पारा चढला आहे. गणपतमध्ये टायगर नेहमीप्रमाणेच त्याच्या ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे.
Tiger Shroff ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याचा एक डायलॉग ही आहे. तो म्हणजे “मला ना लढाई आवडते, ना लढणारे. आता विचार करतोय दोघांपैकी कुणाला संपवू.” त्यामुळे आता तो नक्की कोणत्या प्रकारची भूमिका साकारणार हे पाहण्यायासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. तर हा व्हिडिओ शेअर करत Tiger ने लिहिले की, “ज्या जगात दहशतवादाचं राज्य आहे, तिथे गणपत लोकांचा आवाज बनून येत आहे.”
तर गणपत या स्टोरीचा पहिला भाग येत्या २० ऑक्टोबर २०२३ रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये Tiger सह बॉलिवूडचा शेहनशाह Amitabh Bachchan आणि Kriti Sanon देखील पाहायला मिळणार आहे. यामुळे प्रेक्षकवर्ग अगदी आतुरतेने या सिनेमाची वाट पाहत आहेत.