छोटया पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस’. नुकतंच ‘बिग बॉस’च्या १७ व्या सिझनने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या शोमुळे अनेकांचं नशीब बदलतं, पण अनेकांच नशीब धुळीस देखील मिळतं. बिग बॉस १७ च्या घरातून बाहेर पडलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचं नशीब मात्र चमकलं आहे. अंकिता बिग बॉसमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. बिग बॉसमधील तिचे विकी जैन सोबतचे वाद कायम चर्चेचा विषय होता. अर्थात अंकिता ट्रॉफीपासून काही पावलं मागे राहिली, पण लोकप्रियतेपासून हुकली नाही.
टेलिव्हिजनवरील सगळ्यात लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ओळखली जाते. अंकिताने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यापैकी एक मालिका म्हणजे ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अंकिता घराघरात पोहचली. अंकिताला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच अनेक प्रोजेक्ट मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वीच अंकिताने तिच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली, अंकिता बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ‘रणदीप हुड्डा’ याच्यासोबत ‘वीर सावरकर’ या चित्रपटात झळकणार आहे. तर आता आणखी एक बातमी समोर आली आहे.
अंकिता आता ‘एकता कपूर’ यांच्या ‘नागीण ७’ या मालिकेत झळकणार आहे. नागीण ही टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय आणि हिट मालिका आहे. या मालिकेचे आतापर्यंत ६ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता या मालिकेचा ७ वा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या मागील भागांमध्ये अनेक मोठमोठ्या अभिनेत्रींनी काम केलं आहे. अंकिता आता लवकरच शूटिंगला सुरुवात करणार आहे. तर या मालिकेत अंकिता बरोबरच ‘बिग बॉस १६’ फेम अंकित गुप्ता देखील प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहे. त्याच बरोबर आयेशा खान, प्रियांका चहर चौधरी आणि रीधिमा पंडित देखील या मालिकेत दिसून येणार आहेत अशी चर्चा सुरु आहे. या बातमीमुळे प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक झाले आहेत.
हे देखील वाचा: विरुष्का दुसऱ्यांदा होणार आई-बाबा, एबी डिव्हिलियर्सने सांगितली गोड बातमी…
अंकिताचा वीर सावरकर हा सिनेमा २२ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक दिवसानंतर अंकिता मोठ्या पडद्यावर परतणार आहे त्यामुळे तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.