फ्रेंच शहरात कान्स येथे दरवर्षी आयोजित केला जाणारा फिल्म फेस्टिव्हल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु झाला आहे. कान्समध्ये हा फेस्टिवल 16 मे पासून सुरु झाला असून २७ मे पर्यंत पार पडणार आहे. उर्वशी रौतेला सोबतच बॉलिवूड मधील काही सेलिब्रीटींनी देखील या मोहोत्सवात आपल्या ग्लॅमरचा तडका लावला आहे.
महोत्सवाच्या ठिकाणी प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा यांच्याशिवाय उर्वशी रौतेला इशा गुप्ता, सारा अली खान व मनुषी छिल्लर यांनी देखील हजेरी लावली होती. सगळ्याच सेलीब्रिटी ह्या सोशल मिडीयावर सतत कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. तशीच उर्वशी देखील कायम सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत असते. कान्स २०२३ च्या रेड कार्पेटवर उर्वशीने तिच्या जबरदस्त लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तिने घातलेलं गळ्यातले सगळ्यांनाच आकर्षित करणार व काही तरी वेगळ वाटणार होते.
View this post on Instagram
उर्वशीने घातलेल्या गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये ती अगदीच सुंदर दिसत होती. तिने नेहमी प्रमाणे तिच्या मोहक शैलीने चाहत्यांची मन जिंकून घेतली. या ओपनिंग लूकचे काही फोटो व व्हिडीओ तिने तिच्या सोशल मिडिया अकाऊंट वरून शेअर केले आहेत. तिचा हा लूक रेड कार्पेटसाठी अगदी योग्य आहे.
हे देखील वाचा : कोण होता ‘सायनाईड मोहन’ ?
तिने घातलेल्या नेकपीसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तिने गुलबी गाऊन सोबत चक्क मगरीचा हार घातला आहे. व त्याच्यावर मॅचिंग कानातले त्यांना देखील छोट्या मगरी जोडल्या आहेत.
View this post on Instagram
२०२२ मध्ये देखील उर्वशीने कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये भारताच प्रतिनिधित्व केले होते. तिने पोस्ट केलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून अनेक युजर्सच्या तिला कॉमेंट्स देखील येत आहेत.
एका यूजरने लिहिले की, ‘जर गळ्यातील सरडा जिवंत झाला तर तू फोटोशूट सोडून पळ काढशील’ तर दुसऱ्याने लिहिले की, तू खूप सुंदर आहेस, पण गळ्यात सरडा का लटकवला आहेस?