मराठी कलाकार वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात ते म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची. काल अगदी दिमाखदार पद्धतीने हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली होती. आपल्याला कलेला व आपल्या चित्रपटाला दाद मिळावी म्हणून या पुरस्काराची सगळेच वाट पाहत असतात. तसेच कोणाला हा पुरस्कार मिळणार याकडे देखील सगळ्यांचे लक्ष असते.
अखेर काल रात्री ही प्रतीक्षा संपली, आणि पुरस्कार घोषित करण्यात आले. फिल्मफेअर पुरस्कार मध्ये ‘गोदावरी’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या यादीत बाजी मारली. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निखिल महाजन, सर्वोत्कृष्ट पटकथा निखिल महाजन, प्राजक्त देशमुख, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र आणि अभिनेता जितेंद्र जोशीला बेस्ट क्रिटिक्स अभिनेता म्हणून पुरस्कार मिळालाय. अशा प्रकारे जवळजवळ सगळ्याच कॅटेगरी मध्ये गोदावरी या सिनेमाने बाजी मारली आहे.
सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री म्हणून हृता दुर्गुळे हिला अनन्या साठी पुरस्कार मिळाला. मी वसंतराव सिनेमासाठी अनिता दाते हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून तर राहुल देशपांडेंना कैवल्यगान सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून पुरस्कार मिळाला. चंद्रमुखी सिनेमासाठी आर्या आंबेकर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक स्त्री, अजय – अतुलला सर्वोत्कृष्ट संगीत, चंद्रा साठी दीपाली विचारे यांना सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. बालभारती सिनेमातील आर्यन मेघनजी याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार मिळाला आहे. वेड सिनेमातील खुशी हजारेला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून फिल्मफेयर मिळाला आहे