मराठी सिनेसृष्टीत अनेक पुरस्कार सोहळे दरवर्षी पार पडतात, त्यातीलच एक मानाचा आणि प्रतिष्टेचा पुरस्कार सोहळा म्हणजे ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’. दरवर्षी हा सोहळा अगदी थाटामाटात आणि दिमाखदार पद्धतीने पार पडतो. या वर्षी देखील तितक्याच उत्साहाने आणि थाटामाटात हा पुरस्कार सोहळा पार पडला. संपूर्ण महराष्ट्राचे याकडे लक्ष लागलेले होते. तसेच हा पुरस्कार मिळणं ही प्रत्येक कलाकाराची ईच्छा असते.
२०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘वेड’या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या सिनेमाला प्रेक्षकांनकडून भरभरून प्रेम मिळालं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील भरपूर कमाई केली. फक्त चाहत्यांकडून नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यांकडून या सिनेमाचं कौतुक झालं. तसेच बॉलीवूड मधील कलाकारांनी देखील सिनेमाचं भरभरून कौतुक केलं.
या सिनेमाचं दिग्दर्शन मराठमोळा अभिनेता रितेश विलासराव देशमुख याने केलं होतं. बॉलीवूडसह मराठीमध्ये देखील रितेशने त्याचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘लय भारी’या सिनेमातून रितेशने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्याचा हा सिनेमा देखील चांगलाच गाजला होता. पण दिग्दर्शक म्हणून रितेशचा पहिलाच सुपरहिट ठरलेला सिनेमा म्हणजे ‘वेड’. दिग्दर्शनाबरोबरच रितेशने यात मुख्य भूमिका देखील साकारली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने जेनिलीयाने देखील मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.
यंदाच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’या पुरस्कार सोहळ्यात ‘वेड’ने बाजी मारली आहे. एक, दोन नाही तर तब्बल ९ पुरस्कार ‘वेड’ने आपल्या नावी केले आहेत. यामध्ये रितेशला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ हा पुरस्कार मिळाला. रितेशने दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच सिनेमाला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ म्हणून पुरस्कार मिळाला. यावेळी रितेश म्हणाला, “पहिली व्यक्ती जिने मला, मी दिग्दर्शक होऊ शकतो असं सांगितलं ती म्हणजे माझी बायको जेनेलिया. त्यामुळे माझा हा दिग्दर्शक म्हणून पहिला पुरस्कार जेनेलिया फक्त तुमच्यासाठी.” त्यांनतर रितेश जेनेलियाला घट्ट मिठी मारतो. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. रितेश आणि जेनेलिया यांच्याकडे एक आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच आवडते. तसेच ते दोघ एक लोकप्रिय जोडपं आहे.
View this post on Instagram
हे देखील वाचा: असं काय झालं? की, विक्रांतचे मित्र एका तासातच निघून गेले…
यंदा या पुरस्कार सोहळ्यात ‘वेड’चा बोलबाला पाहायला मिळाला. ‘वेड’ने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – रितेश देशमुख, सर्वोत्कृष्ट अभिनेता- रितेश देशमुख, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – जेनेलिया देशमुख, सर्वोत्कृष्ट गाणं – सुखं कळले, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट गायिका, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चेहरा – जेनेलिया, स्टाईल आयकॉन ऑफ द इयर – रितेश देशमुख हे ९ पुरस्कार आपल्या नावावर केले.