बॉलीवूडची बेबो म्हणजे करीना कपूर खान. करीना ही बॉलीवूड मधील एक टॉपची अभिनेत्री आहे. ती नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते, ती सोशल मिडियावर देखील नेहमीच सक्रीय असते. करीनाने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिने साकारलेल्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यातील काही भूमिका अशा आहेत, ज्या आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या. त्यातीलच एक पात्र म्हणजे ‘कभी खुशी कभी गम’ मधील ‘पू’. आजही हे पात्र लोकांच्या मनात आहे, २२ वर्षानंतर देखील अनेक मुली या पात्राची नक्कल करताना दिसून येतात.
करीना नुकतीच एका फुटवेअर ब्रँडच्या लाँचिंगला गेली होती आणि तिने तिथे एक मुलाखत दिली, ज्यात ती अस म्हणाली, “पू हे एक प्रतिष्ठित पात्र होतं. काही पात्रांना स्पर्श करू नये. ते जसे आहेत तसे त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. पूची भूमिका कोणीही करू शकत नाही आणि करू नये.” पुढे तिला विचारण्यात आले, की तुला तुझ्या पात्राचा कोणता पोशाख ट्रेंडमध्ये आणायचा आहे, तेव्हा तिने ‘पू’च्या ‘बोले चुडिया’ आउटफिटचे नाव घेतले.
करीना शेवटची दिसली ती ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटात, यामध्ये ती अमीर खान सोबत दिसली होती. पण तिचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला, व बॉक्स ऑफिसवर फार काही कमाई करू शकला नाही. आता करीना कपूर लवकरच ‘द क्रू’ च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमात करीना व्यतिरिक्त क्रिती सनॉन आणि तब्बू सारखे स्टार्स दिसणार आहेत.