बॉबी देओलने ‘अॅनिमल’ चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा चित्रपट रसिकांची मने जिंकून चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले असे म्हटले जात आहे. सिनेमातील त्याची भूमिका कमी वेळ असूनही सर्वत्र त्याच्याच भूमिकेची चर्चा होताना दिसत आहे. बॉबीचे चाहते आणि समीक्षकांनी चित्रपटाच्या यशात त्याच्या योगदानाचे कौतुक केले.
हा सिनेमा बॉबी देओलसाठी रोलरकोस्टर सिनेमा ठरला आहे. बॉबी देओलने 1995 मध्ये “बरसात” या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने “गुप्त” (1997), “सोल्जर” (1998), “बिच्छू” (2000) आणि “करीब” (1998) यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, यानंतरच्या काळात त्याच्या चित्रपटांची कामगिरी खालावू लागली. त्यानंतर, त्याने काही वर्षांसाठी चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला.
आता आलेल्या ‘अॅनिमल‘ मधील त्याच्या आश्चर्यकारक कामगिरीनंतर सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. सिनेमातील #JamalKudu या गाण्यात #BobbyDeol च्या डोक्यावर व्हिस्कीचा ग्लास, बोटात सिगारेट असा #BobbyDeol swagggg दिसत आहे आणि हाच त्याचा स्वॅग परफॉर्मन्स बघण्यासाठी लोक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. #JamalKudu या गाण्याने सोशल मिडीयावरही धुमाकूळ घातला आहे.
0 संवाद आणि 20-25 मिनिटांची स्क्रीन असलेल्या सिनेमात बॉबी देओलने खरोखरच करिश्मा दाखवला आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना हे “अॅनिमल” चे मुख्य स्टार असले तरी बॉबी देओलच्या निर्दयी भूमिकेने खरोखर धुमाकूळ घातला आहे.