गौतमी देशपांडे लग्न: २०२३ हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी चांगलंच कमालीचं ठरलं आहे. या वर्षात अनेकांनी नवनवीन गाड्या खरेदी केल्या, तर काहींनी आपल्या स्वप्नातलं घर खरेदी केलं, तर काहींना आई-वडील होण्याचे परमसुख लाभले, तर काहीजण आपल्या प्रेमाची कबुली देत आपल्या साथीदारासोबत विवाहबद्ध झाले. यंदा इतक्या कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे की, सध्या सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. त्यात आता वर्ष संपता-संपता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. ती अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे (Gautami Deshpande).
माझा होशील ना या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने तिच्या चाहत्यांना खूपच सुंदर सरप्राईज दिले. गौतमी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तसेच तिची बहिण मृण्मयी देखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. मृण्मयी आणि गौतमी यांच्या दोघींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम धुमाकूळ घालत असतात. काही दिवसांपूर्वी गौतमी आणि मृण्मयी यांनी एका लग्नात निळ्या रंगाची सारखी साडी नेसली होती. त्यादरम्यान मृण्मयी आणि गौतमी यांच्यासह मृण्मयीचा नवरा आणि ‘भाडिपा’ फेम स्वानंद तेंडुलकर एका फोटोत दिसले. तेव्हापासून स्वानंद आणि गौतमीचं जमतंय वाटतं, अशा चर्चांना उधाण आले होते.
View this post on Instagram
हे देखील वाचा: थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि अग्नीच्या साक्षीने लिटिल चॅम्प्स झाले श्री. आणि सौ.
दोघी एकमेकींकडे पाहत असतानाचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना बुचकळ्यात पाडणारा प्रश्न विचारत लिहिले की, “काय वाटतं?” त्यामुळे तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या पद्धतीने शक्यता वर्तवली. खास गोष्ट म्हणजे अनेकांनी अचूक अंदाज लावत गौतमी आणि स्वानंद लग्नगाठ बांधणार असलीत असं उघडपणे तर्क लावला. तर आता काही तासांपूर्वी मृण्मयीने पुन्हा एकदा निळ्या रंगातील साडीवरील तोच फोटो स्टोरीमध्ये टाकत ‘hmmm’ असं लिहिलं. त्यानंतर जेवणाची तयारी सुरु असतानाचा व्हिडीओ स्टोरीवर शेअर केला. आणि त्यामध्ये बाजूला लिहिले की, “तयारी” त्यामुळे ही नक्कीच गौतमीच्या लग्नाची तयारी असणार असा अंदाज सर्वांनी बांधला. आणि तो काहीच तासांत खरा ठरला.
View this post on Instagram
मृण्मयीच्या पोस्टवर अनेकांनी “गौतमी आणि स्वानंद यांचं लग्न जमलं?”, “ गौतमी लग्न करतेय का?” यांसारख्या अगणित आणि असंख्य कमेंट्सचा वर्षाव झाला. पण कोणीच काहीच स्पष्ट केले नाही. पण आता मात्र गौतमीचे थेट मेहंदीच्या लूकमधील फोटो समोर आले आणि ती खरंच लग्न करतेय यावर शिक्कामोर्तब झाला. आता नुकतीच मृण्मयीने तिच्या सोशल मीडियावरून स्वानंद सोबतचे खास फोटो शेअर करत लिहिले की, “माझा सिक्रेट सांताचं आगमन थोडं लवकर झालंय. खुप आनंद आणि प्रेम.”
View this post on Instagram
गौतमीने अशा अचानक दिलेल्या लग्नाच्या गोड बातमीवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी आणि तिचे असंख्य चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.
हे देखील वाचा: बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक ‘रुपाली’ने अंकिता आणि बिग बॉसला चांगलेच सुनावले…