या लोकप्रिय वेबसिरीजच्या दुसऱ्या भागात ‘मृण्मयी’सह झळकणार अनेक मराठी कलाकार : मराठी सिनेसृष्टीतील कलाकार सध्या हिंदी सिनेसृष्टीतही प्रचंड लोकप्रिय आहेत. मराठीसह हिंदीमध्ये देखील कलाकारांनी साकारलेल्या भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. एक उत्तम कलाकार तोच, जो कोणत्याही ठिकाणी केवळ त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकून घेऊ शकतो. अशीच एक मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री म्हणजे ‘मृण्मयी देशपांडे.’
मृण्मयी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांतून, तर कधी मालिका, तर कधी सिनेमांतून नेहमीच प्रेक्षकांसमोर येत असते. तसेच सोशल मीडियावरील तिचे फोटो आणि रील चांगलेच व्हायरल होत असतात. मृण्मयीने एक पोस्ट शेअर करत नुकतीच एक घोषणा केली आहे. मृण्मयी लवकरच एका लोकप्रिय वेबसिरीजच्या दुसऱ्या सीजनमध्ये दिसणार आहे. आणि ती वेबसिरीज म्हणजे ‘मुंबई डायरीज’. या वेबसिरीजचे पोस्टर शेअर करत याबद्दलची माहिती तिने दिली.
भूतकाळात मुंबईत घडलेल्या निरनिराळ्या गंभीर परिस्थितीवर ही पूर्ण वेबसिरीज असणार आहे. यापूर्वी या वेबसिरीजचा पहिला भाग २०२१ साली प्रदर्शित झाला. या वेबसिरीजच्या पहिल्या भागात २६/ ११ च्या हल्ल्याबद्दल दाखवण्यात आले. मुंबई डायरीज वेबसिरीजचा पहिला भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडला. त्यामुळे पुढील भाग कधी येणार? कोणत्या घटनेवर आधारित असणार याकडेच साऱ्यांचे लक्ष वेधले होते.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच मुंबई डायरीज वेबसिरीजच्या दुसऱ्या सीजनची घोषणा झाली. आता नुकताच दुसऱ्या सीजनचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या पुरामुळे मायानगरीचा अंत होईल की काय अशा भीतीदायक परिस्थितीचा आढावा या वेबसिरीजमधून घेण्यात येणार आहे.
अशा भयावह परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, मुंबईकरांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पोलीस, डॉक्टर आणि अनेकांनी अथक प्रयत्न केले. त्यापैकी डॉक्टरांच्या दृष्टीकोनातून ही वेबसिरीज बनवण्यात आली आहे. त्यावेळी हॉस्पिटलचे कर्मचारी नक्की कोणत्या परिस्थितीला आणि आव्हानांना तोंड देत होते हे यातून दाखवण्यात आले आहे. या वेबसिरीजमध्ये मोहित रैना, टीना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजीत दुबे, कोंकणा सेन यांच्यासह अनेक मराठी कलाकर झळकले आहेत. त्यामध्ये सोनाली कुलकर्णी, शरद पोंक्षे, मृण्मयी देशपांडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
‘मुंबई डायरीज २’ ही वेबसिरीज एकूण आठ भागांची असून येत्या ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा : अशोक सराफ’ यांनी सांगितले सध्या मराठी सिनेमात काम न करण्यामागील खरे कारण