सध्या सर्वत्र चर्चेत असलेला रिॲलिटी शो म्हणजेच ‘बिग बॉस’ सध्या बिग बॉस १७ च्या (Big Boss 17) पर्वातील सर्वाधिक चर्चेतील जोडी म्हणजे अंकिता लोखंडे आणि विकी जैन. या दोघांची भांडणं असो वा त्यांच्या रोमँटिक अंदाज ते दोघे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहेत.
बिग बॉसच्या घरात बऱ्याचदा अंकिताला इतर सदस्यांपेक्षा वेगळी वागणूक दिली जाते. अनेकदा बिग बॉसकडून अंकिताला स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याची चर्चा रंगते. त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये सुद्धा बऱ्याचदा नाराजी व्यक्त झाली आहे. येवढंच नाही तर आई कुठे काय करते या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री व बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील रूपाली भोसले (Rupali Bhosle) हिने सुद्धा इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत बिग बॉस १७ बद्दल आपलं मत मांडल आहे. यावेळी अंकिताला या खेळात बिग बॉसकडून विशेष सवलती मिळत आहे असं म्हणाली. तिच्या या स्टोरीवर अनेकजण प्रतिक्रिया ही देत आहे.
या पोस्टमधून रुपालीने थेट अभिनेत्री अंकिता लोखंडेवर निशाणा साधला आहे. रूपालीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “वीकेंडच्या वारला मनाराला मोठ्यांचा आदर कर असं नेहमी सांगितलं जातं. पण, इशाचं काय? तिला कधीच काहीच बोललं जात नाही. नील, रिंकू मॅम, ऐश्वर्या या इंटस्ट्रीमधील मोठ्या लोकांशी ती १९ वर्षांची मुलगी नेहमीच उद्धट बोलते. ‘बिग बॉस’ तुम्ही आधीसारखे नाही राहिलात आता पूर्णपणे तुमच्यात बदल झालाय.”
तसेच अंकिताला सुनावताना लिहिले की, “अंकिता पहिल्या दिवसापासून, मी एकटी आहे, स्वतंत्र खेळते असं सांगत फिरत असते. पण, प्रत्यक्षात असं ती एकदाही वागत नाही. करण जोहरने तिला अगदी योग्य सल्ला दिला होता. नॉमिनेट झाल्यावर ती सुशांत सिंह राजपूतचं नाव का घेते? प्रत्येकवेळेला तिला सुशांतच्या चाहत्यांकडून सहानुभूतीची अपेक्षा असते. जर तू खरंच हुशार आहेस आणि नेहमी स्वतंत्र खेळू शकतेस, तर त्याच्या नावाचा आधार का घेतेस? तुला जुन्या गोष्टी व भूतकाळ घरात आठवण्याची काहीच गरज नाहीये.”
View this post on Instagram
बिग बॉस या शोबद्दल बोलताना रुपाली म्हणाली की, “‘बिग बॉस’ आम्ही टास्क खेळून एक-एक पॉवर मिळवायचो किंवा टास्क केल्यावरच आम्हाला घरात वापरण्यासाठी सामान मिळायचं. पण, या घरात सगळ्या सदस्यांना सेव्हन स्टार हॉटेलसारखी वागणूक देण्यात येत आहे. हेअर ट्रिटमेंट करण्यासाठी बाहेरची लोक येत आहेत. मस्तच!”
रुपालीही बिग बॉस मराठी २ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यामुळे यावेळी एक माजी स्पर्धक म्हणून तिने आपले मत व्यक्त केले. तिचे हे मत आता केवळ तिच्या एकटीचे राहिले नसून हे या मताला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे रुपालीची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.