गोव्यामध्ये रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी IFFI – International Film Festival of India (भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) पार पडला. या महोत्सवासाठी देशभरातून अनेक दिग्गज मंडळीनी हजेरी लावली.
अजय देवगण, कार्तिक आर्यन, वरून धवन, सुनील शेट्टी, परेश रावल, सारा अली खान यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांमुळे महोत्सव एकदम धुमधडाक्यात पार पडला. या महोत्सवासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच इतर राजकीय क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते.
या महोत्सवात सर्वात अधिक आकर्षण होते ते म्हणजे IFFI चा “इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर २०२२” या पुरस्काराचे. तर या पुरस्काराची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. यंदाचा हा पुरस्कार ६७ वर्षीय मेगास्टार चिरंजीवी यांना मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ट्वीट करत चिरंजीवीला शुभेच्छा दिल्या.
Chiranjeevi Garu is remarkable. His rich work, diverse roles and wonderful nature have endeared him to film lovers across generations. Congratulations to him on being conferred the Indian Film Personality of the Year at @IFFIGoa. @KChiruTweets https://t.co/yQJsWL4YhG
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2022
चिरंजीवी यांनी आतापर्यंत जवळपास चार दशक ही चित्रपटसृष्टीसाठी दिली आहेत. चिरंजीवी यांनी १९७८ मध्ये पुनाधिरल्लू या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटातून आपल्याला मेगास्टार मिळाला असे बोलणे वावगे ठरणार नाही. तेलुगूमधील दीडशेहून अधिक चित्रपट तसेच हिंदी, तमिळ आणि कन्नडमधील ही अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये चिरंजीव यांनी काम केले आहे. चिरंजीवी प्रसिद्ध अभिनेते सोबतच चित्रपट निर्माते सुद्धा आहे.
चिरंजीवी यांना त्यांच्या या कारकिर्दीत आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांना आतापर्यंत १० फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत.
दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांचे ‘Walter Veerayya’ आणि ‘Bholaa Shankar’ हे दोन सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.