२०२३ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या स्टार किड्सची यादी खालीलप्रमाणे
सुहाना खान
किंग खानची मुलगी सुहाना खान 2023 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे, झोया अख्तरच्या ‘ द आर्चीज ‘ या चित्रपटात सुहानाची महत्त्वपूर्ण भूमिका असेल.
शनाया कपूर
अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बेधडक या चित्रपटातून शनाया कपूर चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
अगस्त्य नंदा
अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा 2023 मध्ये ‘द आर्चीज’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज झाला आहे.
खुशी कपूर
बोनी कपूरची मुलगी आणि जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर, द आर्चीजमधून पदार्पण करणार आहे. झोया अख्तरचा हा चित्रपट आहे.
पश्मिना रोशन
हृतिक रोशनची चुलत बहीण आणि चित्रपट निर्माते राजेश रोशन यांची मुलगी पश्मिना रोशन देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इश्क विश्क रिबाउंड या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारणार आहे.
पलक तिवारी
2023 मध्ये श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पलकच्या बॉलिवूड डेब्यूसाठी श्वेता तिवारीने खूप मेहनत घेतली आहे.
अलिझेह अग्निहोत्री
अलीझेहही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती सलमान खानची भाची आणि अलविरा खान आणि दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. ती हिंदी रिमेक हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.