प्रेक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठा साम्राज्याचा इतिहास विविध शो आणि चित्रपटांच्या माध्यमातून पाहिला आणि साजरा केला. महाराजांची ऑनस्क्रीन भूमिका करणाऱ्या कलाकारांच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. अमोल कोल्हे ते भूषण प्रधान या कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना थक्क केले. चला तर पाहूयात ज्यायांनी महाराजांची भूमिका साकारली…
अमोल कोल्हे
अभिनेता अमोल कोल्हे यांनी अनेक टीव्ही शोमध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. ज्यात राजा शिवछत्रपती, शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजामाता, आणि स्वराज्य सौदामिनी ताराराणी या कार्यक्रमांचा समावेश आहे. अमोल कोल्हे हे शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी स्क्रीनवर साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीचं दाद दिली
शरद केळकर
“तानाजी: द अनसंग वॉरियर” मध्ये अभिनेता शरद केळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. आपल्या पात्राला शरद यांनी आपल्या अभिनयातून न्याय दिला, असे बोलणे वावगं ठरणार नाही.
प्रसाद ओक
सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेल्या ‘हिरकणी’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक यांनी महाराजांची भूमिका करून सर्वांना चकित केले होते. त्याच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला.
भूषण प्रधान
‘जय भवानी जय शिवाजी’ या शोमध्ये अभिनेता भूषण प्रधान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. टीव्हीवर महाराजांची भूमिका साकारणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान असल्याचेही अभिनेता भूषण प्रधान याने त्यावेळेस सांगितले होते.
महेश मांजरेकर
२००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात अभिनेते महेश मांजरेकर यांनी छत्रपतींची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे अभिनय कौशल्य आणि संवाद आजही मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत.
अक्षय कुमार
बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार आगामी चित्रपट ‘वेदात मराठे वीर दौडले सात’ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. प्रेक्षक आणि चाहते अक्षय कुमारच्या मराठा योद्धा-राजाच्या भूमिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार असून चाहत्यांसाठी एक व्हिज्युअल ट्रीट असल्याचे वचन दिले आहे.