अभिनेत्री ‘केतकी चितळे‘ आतापर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांतून प्रेक्षकांसमोर आली आहे. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. असे असले तरी केतकी आक्षेपार्ह विधानांमुळे तिचे काही चाहते तिच्यावर नाराज असतात.
केतकी चितळे सध्या तिच्या मालिका किंवा सिनेमामुळे नाही तर अनेक आक्षेपार्ह विधानांमुळे प्रचंड चर्चेत असते. यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे. तसेच तिला एकदा अटकही झाली होती. तर आज पुन्हा एकदा तिच्या चर्चांना उधाण आले आहे. यावेळी चर्चांचे कारण मात्र थोडे वेगळे आहे.
View this post on Instagram
केतकीच्या चर्चांचे कारण म्हणजे तिच्या आतापर्यंत वागणुकीचा परिणाम तिच्या सोशल मीडियावर झाला आहे. तिचे फेसबुक अकाऊंट आता लॉक झाले असून तिच्या इंस्टाग्रामवरील ब्रँडेड कंटेंटची पात्रता देखील काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे ती प्रचंड रागात असून तिने एका पोस्ट मार्फत तिचा राग व्यक्त केला आहे.
केतकीने पोस्ट करत लिहिले की, “माझे फेसबुक खाते लॉक केले गेले आहे आणि इंस्टाग्रामने माझी ब्रँडेड कंटेन्ट पात्रता काढून टाकली आहे. मेटा पुन्हा-पुन्हा रिंग विंग लोकांना कसे बंद करू इच्छित आहे हे सिद्ध करत आहे!
- मी अजूनही ट्विटरवर आहे. हँडल आहे: विकिची
- YouTube वर: epilepsy_warrior_queen
आणि एक नवीन चॅनेल “Let’s Talk”
- Spotify, Google, Amazon वर माझे पॉडकास्ट: लिविंग लाइफ विथ द केल्फिगर्ल
आणि बहुधा मी लवकरच इतर सोशल मीडियावर येईन किंवा माझी स्वतःची वेबसाइट सुरू करेन जिथे मी खऱ्या गोष्टींचा उलगडा करत राहीन.”
केतकीच्या या पोस्टवर काहींनी कमेंट्स करत तिला पाठिंबा दर्शवला आहे.