प्रियांका चोप्रा ही आजही बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण मागील काही वर्षांपासून प्रियांका बॉलीवूड मधून नाहीशी झाली आहे. प्रियांका आता हॉलीवूड मध्ये काम करते. तसेच प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनस सोबत लग्नगाठ बांधून तिकडेच स्थायिक झाली आहे.
आर्मचेअर एक्स्पर्ट या पॉडकास्ट शोमध्ये प्रियंकाने बॉलिवूडबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते. तिने कोणाचेही नाव न घेता सांगितले होते की तिला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं चित्रपटांमध्ये घेतलं जात नव्हतं, मला खूप जणांकडून तक्रारी होत्या. मला इंडस्ट्रीत गेम खेळता येत नाही, इथल्या राजकारणाला मी कंटाळले होते आणि मला ब्रेक हवा होता, हॉलिवूडमध्ये संधी मिळाली आणि मी तिकडे गेले, असं प्रियांका म्हणाली.
यावर बॉलीवूडची काँट्रॅव्हर्सी क्वीन कंगना राणौत हिने भाष्य केले आहे. करण जोहरनेच प्रियंकाला बॅन केलं होतं. कंगनाने याबद्दल भल मोठ ट्वीट करत लिहिले आहे कि, “ प्रियंकाविरोधात लोकांनी गटबाजी केली, तिला बुली केलं आणि बॉलिवूडमध्ये काढून टाकलं.”
This is what @priyankachopra has to say about bollywood, people ganged up on her, bullied her and chased her out of film industry” a self made woman was made to leave India. Everyone knows Karan Johar had banned her (1/2) https://t.co/PwrIm0nni5
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 28, 2023
यावर आणखी ट्वीट करत लिहिले आहे की, “प्रत्येकालाच ठाऊक आहे की, करण जोहरने प्रियंकाला बॅन केलं होतं. मीडियाने करण जोहरशी प्रियंकाच्या असलेल्या मतभेदांबद्दल मोठ्या प्रमाणात लिहिलं. कारण शाहरुख आणि चित्रपट माफिया क्रुएला यांच्याशी करणची मैत्री आहे. तो नेहमी अशाच आऊटसाईडर्स शोधात होता. प्रियंकाच्या रूपात त्याला पंचिंग बॅग मिळाली. त्याने प्रियंका चोप्राचा इतका छळ केला की तिला भारत सोडावा लागला. या मतलबी आणि विषारी माणसाला बॉलिवूडचं वातावरण बर्बाद करण्यासाठी जबाबदार ठरवलं गेलं पाहिजे. त्याच्या टोळी आणि माफिया पीआरवर छापे टाकून बाहेरील लोकांना त्रास दिल्याबद्दल त्याला जबाबदार धरले पाहिजे.”