बॉलिवूड मधील अत्यंत नावाजलेली अभिनेत्री करिश्मा कपूर हिने आज वयाची ५० वर्ष पूर्ण केली आहेत. १७ वर्षाची असल्या पासून तीने अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘प्रेम कैदी‘ हा तिचा पहिला चित्रपट होता या चित्रपटाच्या माध्यमातून तीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्यं गाजवलं. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. तिने बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांन सोबत काम केलं आहे. आत्ता जरी ती सिनेसृष्टीपासून दूर असली तरी तिच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांच्या मनावर अजूनही तशीच आहे.
लग्नानंतर ती चित्रपट सृष्टीपासून दूर राहिली असली तरी ती एकेकाळी बॉलिवूडवर राज्यं करत होती. करिश्मा कपूरने पती संजय कपूर सोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती तिच्या मुलांसोबत मुंबई मधील आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. ती मोठ्या पडद्यापासून जरी दूर राहिली असली तरी सुद्धा जेव्हा तीने ‘नच बलिये’ या रियालिटी शो मध्ये जज म्हणून कमबॅक केलं तेव्हा तीचं खूप कौतुक झाले. ती जरी चीत्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती अनेक वेबसिरीज व जाहिरातींमध्ये झळकली आहे.
करिश्मा जरी आत्ता चित्रपटांपासून लांब असली तरी सुद्धा विविध व्यवसायाच्या माध्यमातून तिने कोठ्यावधीची संपत्ती कमावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूरची एकूण संपत्ती सुमारे ४०० कोटी रुपये आहे. स्मार्ट शेअर गुंतवणूक, शेअरहोल्डिंग आणि मालमत्तांमध्ये गुंतवणूक करून तिने भरपूर संपत्ती कमावली आहे. ती वेब सिरीज व ब्रँन्ड एंडोर्समेंट च्या माध्यमातून खूप कमाई करते. एका जाहिरातीचे ती १.५ कोटी रुपये घेते. दिल्लीमध्ये करिश्मा कपूर ‘फॅट कपूर बर्गर चेन’ या नावाने रेस्टोरंट देखील चालवते. तसेच तिने ‘मुंबई एंजल्स’ ही फुटबॉल टीम देखील विकत घेतली आहे. तिला प्राचीन काळातील वस्तूंची देखील खूप आवड आहे. तिच्या घरात अनेक प्राचीन वस्तूंच्या चित्रांचा संग्रह पाहायला मिळतो.