गौरी सावंत ही काही वर्षापूर्वी ‘विक्स’ कंपनीच्या जाहिरातीतून समोर आली होती. एका तृतीयपंथीच्या आयुष्याचा संघर्ष काय असतो हे या जाहिरातीतून समजलं आणि गौरी सावंत हे नाव घराघरात पोहोचले. ‘ताली’ या वेबसिरीजच्या माध्यमातून गौरीने भोगलेलं दुःख, संघर्ष, कुटुंबाकडून झालेली अवहेलना, वेळोवेळी करावे लागलेलं वैश्य व्यवसाय हे सारच जगासमोर येणार आहे. या वेबासिरिजचे दिग्ग्दर्शक रवी जाधव हे असून अभिनेत्री सुश्मिता सेन, गौरी सावंतची म्हणजे तृतीयपंथीयांची मुख्य भूमिका साकारणार आहे.
सुश्मिताने यामध्ये साडी नेसलेली असून, कपाळावर मोठा टिळा लावलेला आहे. गौरीच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या गोष्टींवर नजर टाकली जाणार आहे. या वेबसिरीजसाठी सुश्मिताने एक व्हिडिओ शेअर करत लोकांना चांगला संदेश दिला आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओ मध्ये गौरी म्हणते, ”क्यों बजती है ताली? बस कुछ रुपये मांगने के लिए? आपका ध्यान खिचने के लिये.. अपना गुस्सा निकालने के लिए.. या घुटन छिपाने के लिए? क्या इसके लिये बजती है ताली..”
त्यावर सुश्मिता म्हणते, नही.. अब ताली बजेगी.. हौसला बढ़ाने लिए, एक नई पहचान दिलाने के लिए, गुंजसे आसमान हिलाने के लिए.. सिर्फ हात नही दिल से दिल को मिलाने के लिए..”
त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आला असून प्रेक्षकाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.