बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी ही सतत सोशल मिडियावर सक्रीय असते. सध्या तिचा ‘मिसेस चटर्जी वर्सेज नॉर्वे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. सिनेमामध्ये राणीने साकारलेल्या भूमिकेच व तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.
राणीमुखर्जीने करीना कपूरच्या ‘व्हाॅट वुमेन वॉन्ट’ या शोमध्ये नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या मुलीला आतापर्यंत मिडिया पासून कसं लांब ठेवलं हे सांगितलं आहे. तिने करीना कपूरला एक सल्ला दिला हा सल्ला तिच्या मुलीशी म्हणजेचं अधिराशी संबंधित आहे. करीना देखील दोन मुलांची आई आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा सल्ला खूप महत्वाचा आणि उपयोगी ठरेलं.
राणीमुखर्जी व आदित्य चोप्रा यांना ८ वर्षाची एक मुलगी आहे. पण अजुन पर्यंत तिचा एकही फोटो मिडिया समोर आलेला नाही. ती वडील आदित्य चोप्रा यांच्या सोबत असताना तिचं एकदा फोटो आला होता. या शोमध्ये राणीने तिच्या मुलीला सोशल मिडिया पासून कसं लांब ठेवलं आहे. याच एक सिक्रेट सांगितलं. या शोमध्ये करीना कपूरनं राणी मुखर्जीला तिच्या मुलीबद्दल एक प्रश्न विचारला. ती म्हणाली, मुलीला लोकांपासून लपवून ठेवण्यासाठी सुपर पावरची गरज आहे का? यावर राणी तिला म्हणते की, “सुपर पावरची तर काहीच गरज नाही पण मी मिडीयावाल्यांना माझ्या मुलीचे फोटो व व्हिडिओ न काढण्यास अत्यंत प्रेमाने व नम्रतेने विनंती करते. ते देखील खूप प्रेमळ असतात आणि सुरूवातीपासून ते माझ्याशी चांगलचं वागत आले आहेत. त्यांना माहिती आहे की आदिला अशा गोष्टी आवडत नाहीत आणि ते आपलं आयुष्य पर्सनल ठेवतात.”
View this post on Instagram
राणीमुखर्जी नेहमीच लाईमलाईटमध्ये असते. मात्र आदित्य चोप्रा नेहमीच लाईमलाईटपासून लांब राहतात. त्यांना नेहमीच आपलं आयुष्य खाजगी ठेवायला आवडतं.
राणी मुखर्जीनं यावेळी सांगितलं की, मला आणि आदिला आदिराला बाकीच्या मुलांप्रमाणेच सामान्य वागणूक द्यायची आहे. मला माझ्या मुलीला शिक्षण देताना सर्वसामान्यं मुलांप्रमाणे द्यायचे आहे. कारण एकाद्या मुलाचे आई वडील जर लोकप्रिय असतील तर त्यांना मिळणारी वागणूक ही स्पेशल असते. राणी मुखर्जी पुढे म्हणाली की, मला आदिराला हे जाणवून द्यायचं आहे की, ती कोणी स्पेशल नाही. बाकीच्या मुलांप्रमाणे ती देखील सामान्य आहे. तिचा कोणाच्या घरी जन्म झाला आहे, हे तिच्यासाठी महत्त्वाचे नाही. तिला तिच्यासाठी खास बनावं लागेल. तिलाच ठरवावं लागेल की, तिन्ह काय व्हाव.