८० आणि ९० च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे.
पद्मिनी कोल्हापुरे यांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘यह इश्क नही आसान’, ‘सुहागन’, ‘अनुभव’, ‘आग का दरिया’, ‘जमाने को दिखाना है’, ‘प्रेमरोग’ हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे. तसेच ‘चिमणी पाखरं’ आणि ‘मंथन’ या मराठी सिनेमांतून देखील त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली. पद्मिनी यांना अभिनयासोबतचं गाण्याचीही प्रचंड आवड आहे.
१९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ऐसा प्यार कहा’ या चित्रपटाने त्यांच नशीबचं पालटलं. या चित्रपटात पद्मिनी या मुख्य भूमिकेत असून मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या सोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाचे निर्माते प्रदीप शर्मा हे होते. पद्मिनी व प्रदीप यांची चित्रपटाच्या सेटवर पहिली भेट झाली. या चित्रपटानंतर त्यांच्या फिल्मी करिअरसोबतच पर्सनल आयुष्यातही अनेक मोठे बदल घडले.
त्यावेळेस पद्मिनी यांच्या सौंदर्याने सर्वांनाचं घायाळ केले होते. पण पद्मिनी मात्र एका व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. ती व्यक्ती म्हणजेच चित्रपट निर्माते प्रदीप शर्मा हे होते. पहिल्या भेटीतचं ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांच्याही जाती वेगळ्या असल्यामूळे त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नासाठी विरोध केला.पण पद्मिनी यांनी ठरवून प्रेम निवडले आणि प्रदीप यांचा हात धरला. त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १४ ऑगस्ट १९८६ मध्ये प्रदीप शर्मा यांच्याशी लग्नगाठ बांधली तेव्हा त्या फक्त २१ वर्षाच्या होत्या.
जेव्हा त्यांच्या आईने त्यांची साथ सोडली तेव्हा त्यांची मैत्रीण म्हणजेच बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्री पूनम ढिल्लन यांनी मैत्रिणीची साथ देत, पद्मिनी यांना लग्नासाठी आपले दागिने आणि कपडे दिले होते.