महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ‘वनिता खरात.’ सकारात्मक दृष्टीकोन ठेवत आपल्या वजनापेक्षा कामाचं वजन कसं वाढवता येईल हे पाहणारी ही अभिनेत्री.
आपल्या अचूक टायमिंगने, उत्तम अभिनयाने आणि अफलातून विनोदाने वनिता कायमच प्रेक्षकांचं मन जिंकून घेत असते. या शो व्यतिरिक्त ती वेगवेगळ्या कार्यक्रमात देखील दिसून येते. तसेच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. सन मराठी या वाहिनीवर आता लवकरच एक नवी मालिका प्रदर्शित होत आहे. ती मालिका म्हणजे ‘सुंदरी.’ या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. या प्रोमोमध्ये वनिताचा खूपच भारी लूक चाहत्यांना पाहायला मिळाला.
View this post on Instagram
Also Read: चुलबुली शिवालीचा हटके लुक तुम्ही पाहिलात का?
या प्रोमोमध्ये मालिकेतील मुख्य अभिनेत्री म्हणजेच कलेक्टर सुंदरी साहेब प्लाझा तोडण्याचे आदेश देते, त्यावेळी एका आलिशान गाडीतून वनिता खरातची एंट्री होते. काळ्या रंगाची साडी, कपाळावर मध्यम आकाराची काळी टिकली अन् त्यावर शोभतील असे दागिने परिधान केलेल्या या भूमिकेत वनिताला पाहून चाहते मात्र थक्क झाले आहेत. तर या प्रोमोमधील तिच्या लूकवरून समजून येते की, या मालिकेत वनिता खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
हा प्रोमो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिले की, “मला वाटतं वनिता खरातने अशाच नवनवीन भूमिका साकारायला हरकत नाही. या मालिकेत ती खलनायिकेची भूमिका खूप सुंदर साकारणार आहे.” तर दुसऱ्याने अगदी गंमतीत लिहिले की, “फायर है तू” चाहत्यांसोबतच सिनेसृष्टीतील सुयश टिळक, पृथ्वीक प्रताप, प्रियदर्शनी इंदलकर यांनी या मालिकेतील वनिताच्या भूमिकेचे आणि तिचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.
तर सुंदरी या मालिकेसह विनोदवीर अभिनेता प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या सिनेमातून देखील वनिता लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
Also Read: या बायोपिकमध्ये ‘प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर’ एकत्र झळकणार