मराठी सिनेसृष्टीतील सुंदर आणि लोकप्रिय जोडी म्हणजे प्रसाद ओक (Prasad Oak) आणि मंजिरी ओक (Manjiri Oak). सध्याच्या काळात मंजिरी आणि प्रसाद एका पाठोपाठ एक असे अनेक दमदार सिनेमे कायम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत, त्यामुळे ते दोघे सतत चर्चेत असतात.
तर सध्या प्रसाद देखील दिवसागणिक अधिकच लोकप्रिय होत आहे. यात मंजिरीचा देखील मोलाचा वाटा आहे. मंजिरी तिच्या नवऱ्याच्या मागे अगदी खंबीरपणे उभी असते. मंजिरी एक गृहिणी, एक आदर्श बायको त्याच बरोबर ती एक उत्तम निर्माती देखील आहे. तसेच प्रसाद आणि मंजिरी दोघेही सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रीय असतात. मंजिरी प्रसादला दिग्दर्शनात देखील मदत करते. जवळपास २३ वर्षे गृहिणी होती. त्या आधी ती २ वर्ष मार्केटिंग क्षेत्रात काम करत होती. त्यावेळी मंजिरी मुंबई लोकलने प्रवास करत होती. नुकतीच मंजिरीने एक मुलाखत दिली त्यात तिने तिच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले.
मुलाखतीत मंजिरीने तिला आलेल्या एका धक्कादायक अनुभवाबद्दल भाष्य केले, यावेळी तिने मुंबई लोकलचा किस्सा सांगितला. मंजिरी म्हणाली की, “हाऊसवाईफ असणं हा खूप मोठा टास्क आहे. मी २३ वर्ष पूर्णपणे हाऊसवाईफ होते. २ वर्ष मी नोकरी केली. २ वर्षानंतर माझ्या मोठ्या मुलाचा जन्म होणार होता आणि मी ९ महिन्यांची गरोदर होते. मी जॉबवरुन निघाले आणि मला विरार फास्ट ट्रेनमधून एकदम ढकलून दिलं. त्यावेळी माझे ९ महिने पूर्ण झाले होते म्हणजे कधीही माझी डिलिव्हरी होईल असं होतं. त्यावेळी मी प्लॅटफॉर्मवर पडले. पोटावर नाही पडले पण पडल्यावर मी खूप घाबरले.”
“मी त्यावेळी मार्केटिंगचा जॉब करायचे आणि त्यामुळे फिरावं लागायचं, सतत २ वर्ष मी फिरत असल्यामुळे मला ट्रेनचा प्रॉब्लेम नव्हता. पण, अचानक हे काय झालं याची मला भीती मनात बसल्यामुळे मग संध्याकाळी प्रसाद घरी आला आणि म्हणाला, आता बस्स..आता तू घरी रहा. तोपर्यंत दुरदर्शनवरच्या त्याच्या काही मालिका सुरु झाल्या होत्या. तेव्हा चॅनेल्स आले नव्हते. पण, दुरदर्शनवर दामिनी, बंदिनी या मालिका सुरु झाल्या होत्या. त्यामुळे बरं इन्कम येत होतं. आमचं भागेल एवढं येत होतं. म्हणून मग मी नोकरी सोडली आणि घरी राहिले.”
मंजिरीने हा धक्कादायक अनुभव सांगितल्यापासून सर्वत्र ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली आहे.