आपल्या अभिनयाने आणि डान्सिंग स्टाईलने तमाम प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते म्हणजे ‘मिथुन चक्रवर्ती’ (Mithun Chakraborty). आज (१० फेब्रुवारी रोजी) सकाळीच मिथुन यांच्या तब्येतीबाबत मोठी घटना समोर आली.
मिथुन चक्रवर्ती यांना आज कोलकत्ता येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागल्यामुळे त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. त्याचवेळी त्यांना खूपच अस्वस्थता देखील जाणवत होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी एकही क्षण न दवडता त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले.
आपल्या सर्वांचे लाडके मिथुन चक्रवर्ती हे सध्या ७३ वर्षांचे आहेत. त्यांचा सिनेसृष्टीतील कारकीर्दीचा काळ प्रचंड मोठा असल्याने त्यांचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. त्यामुळे आज अचानक समोर आलेल्या या बातमीमुळे त्यांचे चाहते काळजीत पडले आहेत. त्यांचा प्रत्येक चाहता, कुटुंबीय आणि संपूर्ण भारतीय सिनेसृष्टी त्यांच्या तब्येतीबद्दल अपडेट जाणून घेण्यासाठी चिंतीत आहे. पण डॉक्टरांकडून किंवा हॉस्पिटलकडून मिथुन यांच्या तब्येतीची कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे.
कोणतीही अधिकृत अपडेट समोर आली नसली, तरी मिथुन यांचा रुग्णालयात दाखल केल्यावर रुग्णालयाच्या बेडवरील त्यांचा फोटो समोर आला. ही धक्कादायक पुढे समोर येताच हा फोटो अगदी वाऱ्यासारखा पसरला. त्यामुळे सारेजण आता मिथुन चक्रवर्ती यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. तसेच ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे हीच देवाकडे मागणी करत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिथुन याची तब्येत सध्या तरी स्थिर आहे. तसेच मिथुन यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. परंतू यावर त्यांच्या कुटुंबीयांनी शिक्कमोर्तब केले नाही. तर कुटुंबीयांपैकी मिथुन यांच्या तब्येतीबद्दल अजूनही कोणीच काहीच माहिती दिली नाही. पण, मिथुन यांचे चाहते मात्र त्यांच्याकडून मिथुन यांची तब्येत नक्की कशी आहे? हे जाणून घेण्यासाठी डोळे लावून बसले आहेत.
काही दिवसांपूर्वीच मिथुन चक्रवर्ती यांना मानाच्या पुरस्करांपैकी पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या आनंदाच्या बातमीवर मिथुन हे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “हा बहुमान मिळाल्याने मी अत्यंत आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया मिथून यांनी दिली. मी खरंतर सगळ्यांनाचे आभार मानू इच्छितो. मी स्वत:साठी कोणाकडे कधी काही मागितलं नाही, पण मला न मागताच बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय आनंद आहे.”