बॉलिवूडमधील अभिनेता आणि अभिनेत्रींना जेवढे ओळखले जाते, तेवढेच स्टार किड्स म्हणून त्यांच्या मुलांना देखील ओळखले जाते. त्यांपैकी अनेक स्टार किड्सनी स्वतःची एक ओळखही निर्माण केली आहे. यापैकी एक म्हणजे अभिनेत्री श्वेता तिवारी हीची मुलगी ‘पलक तिवारी.’
पलक ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. पलक सलमान खानच्या आगामी सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमात देखील झळकणार आहे. श्वेता तिवारी यांनी पलकच्या बॉलिवूडमधील पदार्पणासाठी खूप मेहनत घेतली आहे. तर या सिनेमामुळे पलकची प्रचंड चर्चा होताना दिसते. केवळ सिनेमामुळेच नाही तर पलक सध्या आणखी एका खासगी कारणामुळे चर्चेत आली आहे.
मागील काही दिवसांपासून सर्वत्रच पलक आणि सैफ अली खान याचा मुलगा ‘इब्राहिम अली खान’ हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ते दोघे आतापर्यंत अनेकदा एकत्र दिसले आहेत. कधी पार्टी तर कधी बाहेर फिरताना आढळून आले आहेत. त्यामुळे ते कपल असल्याच्या चर्चा जोर धरत आहे.
हे देखील वाचा : अंकुशच्या पत्नीने ‘महाराष्ट्र शाहीर’ दरम्यानच्या अनेक गोष्टींचा केला खुलासा…
परंतू आता मात्र पलकने इब्राहिम सोबतच्या नात्यावर अखेर भाष्य केले. पलकने आत्ताच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या नात्याचा खुलासा केला. तेव्हा पलक म्हणाली की, “मी आणि इब्राहीम एक कपल आहे यात तथ्य नाही. आम्ही दोघेही फक्त मित्रांसोबत एकत्र भेटतो. दोघे एकटे कधीही नाही भेटत. किंवा दररोज चॅटिंगसुद्धा नाही करत. शिवाय त्याला मी सलमान खानसोबत सध्या चित्रपट करत आहे याबाबतही माहिती नाही.”
त्यामुळे सध्या तरी पलकने त्यांच्या नात्यावर होणाऱ्या चर्चांवर पूर्णविराम दिला.