अभिनेता रितेश देशमुख मागील काही काही महिन्यांपासून त्याच्या ‘वेड’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘वेड’ या चित्रपटाने १०० दिवसांचा टप्पा पूर्ण केला. या १०० दिवसांमध्ये ‘वेड’ ने बॉक्स ऑफिस वर चांगलाच गल्ला जमवला. ‘वेड’ हा प्रेक्षकांच्या देखील चांगलाच पसंतीस पडला आहे.
रितेशने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटासाठी रितेशचे सगळ्या स्तरातून कौतुक झाले. रितेशचे वडील म्हणजेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख याचं स्वप्न होत, की रितेशने मराठी सिनेमांमध्ये देखील काम करावे. ‘वेड’ या चित्रपटाच्या आधी रितेश ‘लय भारी’ आणि ‘लय भारी 2’ या चित्रपटात दिसला होता.
रितेशच्या भावांना मात्र त्याचे चित्रपट आवडत नाहीत, याचा खुलासा रितेश देशमुख याने एका मुलाखती दरम्यान केला. यावेळी रितेश देशमुखला घरात तुझे टीकाकार कोण? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर त्याने “माझ्या घरात माझे सर्वात मोठे टीकाकार हे माझे दोन्हीही भाऊ आहेत.”
View this post on Instagram
“धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे दोघेही माझ्यासाठी मोठे क्रिटीक्स आहेत. आतापर्यंत त्यांना माझं कोणतंही काम आवडलेलं नाही. वेड हा पहिला चित्रपट आहे जो अमित भैय्यांना आवडला. त्यानंतर मी थेट सिद्धिविनायक दर्शनाला गेलो होतो.धीरजचे माझ्यावर खूप प्रेम आहे. तो कायम मला पाठिंबा देत असतो. पण अमित भैय्या हे कायमच मला मार्गदर्शन करत असतात. हे काय जमलं नाही, हे काय आवडलं नाही, हा काय चित्रपट आहे का, असे ते मला सतत सांगत असतात”, असे रितेश देशमुखने म्हटले.