अनेक वर्षांपासून महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगातील मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ संपूर्ण कुटुंबासोबत पाहिला जाणारा हा शो आहे. जेवढा हा शो लोकप्रिय आहे तेवढेच लोकप्रिय आहेत त्यातील कलाकार. आपल्या विनोदबुद्धीने या कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.
चला हवा येऊ द्या हा शो आता प्रेक्षकांच्या जीवनातील अगदी महत्त्वाचा भाग बनला आहे. यामुळे प्रेक्षक आता या शोमधील कलाकारांची आणि ते साकारात असलेल्या पात्रांची अदलाबदल अजिबातच स्वीकारू शकत नाही. यातील विनोदामुळे आणि अनोख्या पद्धतीने साकारलेल्या पात्रामुळे हा शो कायम चर्चेत असतो.
पण यावेळी मात्र या शोच्या चर्चेचं कारण काही तरी वेगळच आहे. या शोमध्ये गेले काही दिवसांपासून एका कलाकाराची कमतरता भासत आहे, तो कलाकार म्हणजे सागर कारंडे. या शोमध्ये सागरने आतापर्यंत अनेक प्रकारच्या पुरुष आणि स्त्री पात्रे साकारली आहेत. पण त्यासर्वांपैकी तो साकारत असलेले ‘पोस्टमन काका’ हे पात्र प्रेक्षकांच्या फारच पसंतीस पडले आहे. त्याच्या या पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान मिळवले आहे.
View this post on Instagram
नुकतेच झी मराठीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये नेहमीप्रमाणे पत्राचे वाचन जरूर होत आहे. परंतू यावेळी पत्राचे वाचन सागर करत नसून चला हवा येऊ द्या मधील लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे करत आहे. तर ‘सुंदर कविता’ असे लिहित हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. काही चाहत्यांनी श्रेयाचे कौतुक केले असले तरी अनेकांनी सागरची कमतरता भासत असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
काही दिवसांपासून सागरने हा शो सोडला आहे अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. परंतू त्यावर वाहिनी आणि सागर कारंडे यांपैकी कोणीच काही स्पष्ट केले नव्हते. पण सागरने सहा महिन्यांपूर्वीच या शोचा निरोप घेतला आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर सागर आता ‘फू बाई फू’ या शोमध्ये दिसणार आहे.
परंतू सागरच्या एक्झिटने चाहते मात्र नाराज झाले आहेत.