आपल्या सगळ्यांची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. सोनाली मागील काही दिवसांपासून तिच्या ‘ताराराणी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाली एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण त्याच बरोबर ती एक उत्तम डान्सर देखील आहे. तिच्या अभिनयावर आणि तिच्या लूक्स वर चाहते नेहमी घायाळ होतात. तिचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहे.
आता सोनाली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोनालीने तिच्या सोशल मिडिया अकाऊंट वरून तिच्या नवीन चित्रपटाचं पोस्टर शेअर करत सगळ्यांना एक सुखद धक्का दिला आहे. त्यापेक्षा आनंदाची बाब म्हणजे सोनाली पहिल्यांदाच दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला तिने चाहत्यांना ही गुड न्युज दिली होती. पण आता तिने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात सोनाली दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्या सोबत दिसणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये डोंगर-दऱ्या, नदी, झाडं-झुडूप दिसत आहेत. त्याबरोबर यात पावलांचे तीन ठसेही पाहायला मिळत आहे. या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ‘मलाइकोकटाई वालीबन’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट नक्की कोणत्या विषयावर आहे, चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे हे अजून समोर आलेले नाही.
सोनालीच्या या पोस्ट वर चाहत्यांसोबतच अनेक कलाकर मंडळींनी देखील कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. चाहते देखील चित्रपटासाठी उत्सुक आहेत.