बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ही काही दिवसांपासून चर्चेत आहे. ती गेल्या काही वर्षापासून मनोरंजन सृष्टीपासून दूर आहे पण ती नेहमी सोशल मिडीयावर सक्रीय असते.
तिने मुंबईमध्ये तिझ्या सोबत घडलेल्या दोन घटना सांगितल्या आहेत. तिने तिझ्या सोशल मिडिया आकाउंट वरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यामध्ये असे दिसून येते की, एक अपंग माणूस पैश्यांसाठी तिच्या गाडीच्या मागे जात आहे. तर दुसऱ्या घटनेत एका अनोळखी महिलेने तिच्या मुलीला जबरदस्ती किस केली आहे. तिच्या सोबत असलेले पापाराझी तिची मदत करण्या एवजी मागे उभे राहून हसत होते. या दोन्ही घटना तिच्यासाठी अतिशय धक्कादायक आहेत. ती म्हणते की, आपण कलाकार असलो म्हणून कोणालाही आपल्या सोबत कसही वागण्याचा हक्क आहे का असा प्रश्न तिने विचारला आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट करत असं लिहिल आहे की, या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांमुळे मी पुर्ण पणे हादरले आहे. त्यातील पहिली घटना म्हणजे माझी मुलगी जिया बरोबर घडली आहे. एका महिलेने तिचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण आम्ही फोटो न काढण्यास नम्रपणे विनंती केली मग तिने सुद्धा फोटो काढण्याचे टाळले व तिथून निघून गेली. थोड्या वेळाने ती पुन्हा फिरून आली व माझ्या मुलीला जबरदस्ती कुशीत घेतलं आणि तिला किस देखील केलं ती खूप गोंडस आहे असं बोलून तिथून पळून गेली. ही बाई एका पॉश बिल्डिंगमध्ये राहते आणि तेव्हा त्याच बागेत होती जिथे माझी मुलं खेळत होती. जर मी सेलिब्रिटी नसते तर कदाचित मी खूप वाईट वागू शकत होते, परंतु मी शांत राहिले कारण मला तिथे भांडण करायचं नव्हतं.
View this post on Instagram
प्रीती झिंटाने दुसऱ्या घटनेचा व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, ‘तुम्ही दुसरी घटना इथे पाहू शकता. मला विमान पकडायचं होतं आणि हा अपंग माणूस मला थांबवण्याचा प्रयत्न करत राहिला. काही वर्षांपासून तो मला पैशांसाठी त्रास देत आहे. माझ्याकडे पैसे असताना मी त्याला पैसेही दिले आहेत. पण यावेळी त्याने विचारल्यावर मी म्हणाले, सॉरी आज माझ्याकडे पैसे नाहीत. एकच क्रेडिट कार्ड आहे. माझ्यासोबत असलेल्या बाईने त्याला तिच्या पर्समधून काही पैसे दिले. ते पैसे पुरेसे नसल्याने त्याने महिलेकडे चक्क परत फेकले. मग त्याला आणखी राग आला आणि तो माणूस काही काळ आमच्या मागे येत होता. तो आणखीनच आरडाओरडा करायला लागला.
View this post on Instagram
‘पापाराझींना ही घटना मजेदार वाटली. आम्हाला मदत करण्याऐवजी त्यांनी ते शूट केलं आणि हसत होते. कोणालाही दुखापत होऊ शकते म्हणून गाडीचा पाठलाग करू नका किंवा आम्हाला त्रास देऊ नका असं कोणीही त्याला सांगितलं नाही. अपघात झाला असता तर मला दोषी ठरवलं असतं, माझ्या सेलिब्रिटी असण्यावर प्रश्न निर्माण झाले असते. बॉलीवूडला दोष दिला असता आणि बरीच नकारात्मकता पसरली असती.’ प्रितीने पुढे तिच्या मुलींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मी कलाकार आहे पण माझ्या मुली कोणत्याही पॅकेज डीलचा भाग नाहीत असं तिने म्हटलं आहे. त्या लहान आहेत त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या. आम्ही माणूस आहोत हे लक्षात घ्या असं तिने लिहिलं आहे.