साऊथची सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रश्मिका मंदाना. रश्मिकाच्या अभिनयामुळे आणि तिच्या कामामुळे देशभरात तिचे करोडो चाहते आहेत. पुष्पा या सिनेमामुळे तिच्या प्रसिद्धीमध्ये आणखीनच वाढ झाली.
रश्मिका सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रीय असते. ती तिच्या चाहत्यांसोबत नवनवीन फोटोज् आणि व्हिडिओ शेअर करत असते. रश्मिका जेवढी तिच्या कामामुळे चर्चेत असते तेवढीच ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आतापर्यंत अनेकदा रश्मिकाच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली आहे.
यापूर्वी रश्मिका आणि विजयदेवरकोंडा यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परुंतू त्यावर त्या दोघांनीही स्पष्टपणे उत्तर दिले नाही. परंतू काही दिवसांपूर्वीच रश्मिका आणि विजयदेवरकोंडा यांचे कथित नाते संपुष्टात आले असेही समोर आले आहे. परंतू त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच रश्मिका आणि श्रीनिवास बेल्लमकोंडा हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली.
रश्मिका आणि श्रीनिवास बेल्लमकोंडा अनेक कार्यक्रमांत आणि विमानतळावर अनेकदा एकत्र दिसले आहेत. ब्रेकअप किंवा श्रीनिवास बेल्लमकोंडासोबत रिलेशनशिप या दोन्ही चर्चांवर रश्मिकाने आजवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतू बेल्लमकोंडा याने मात्र सध्या होणाऱ्या चर्चांवर मौन सोडले आहे. त्यामुळे आता सर्वच गोष्टींचा खुलासा झाला आहे.
हे देखील वाचा : सिनेमाचे स्वप्न पूर्ण होण्यास काही तासांचा कालावधी बाकी असतानाच या दिग्दर्शकाची प्राणज्योत मालवली
सिद्धार्थ कन्ननच्या चॅट शोमध्ये बोलताना श्रीनिवास बेल्लमकोंडा म्हणाला की, “हे कसे घडले हे मला माहित नाही, मला वाटते की हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण आम्ही फक्त चांगले मित्र होतो आणि आम्ही चुकून विमानतळावर एकमेकांना भेटलो होतो. आम्ही दोघे हैदराबादचे आहोत आणि आम्ही मुंबईत येत राहतो त्यामुळे अनेकदा एकमेकांना भेटतो. पण एक-दोनदाच पापाराझींनी आम्हाला विमानतळावरून बाहेर येताना पाहिले असेल.”
रश्मिका लवकरच ‘अॅनिमल’ या सिनेमात रणबीर कपूर सोबत दिसणार आहे. तर श्रीनिवास बेल्लमकोंडा ‘छत्रपती’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.