बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्याच्या लिस्ट मधील एक नाव म्हणजे सनी देओल तो नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांमुळे सोशल मिडीयावर चर्चेत असतो. तसेच त्यांचे कुटुंब देखील सोशल मिडीयावर सतत चर्चेत असत. सध्या चर्चा होत आहे ती म्हणजे त्याचा लाडका मुलगा करण देओल याची.
त्याने गुपचूप एंगेजमेंट केल्याच्या बातम्या समोर येत असून करण देओलने त्याच्या आजी आजोबांच्या म्हणजेच धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एंगेजमेंट केल्याचे बोलले जात आहे. पण त्याने कोणत्या मुलीसोबत एंगेजमेंट केली आहे. हे अजूनही समोर आलेलं नाही. त्यांच्या लग्नासाठी अत्यंत कमी दिवस शिल्लक राहिले असून ते दोघे जूनमध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.
करण देओल जरी अभिनेता असला तरी मात्र त्याच्या होणाऱ्या पत्नीच व चित्रपटसृष्टीच काडीमात्र संबंध नाही. २०१९ मध्ये त्याचे वडील सनी देओलने दिग्दर्शित केलेल्या ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केले. मात्र त्याचा हा चित्रपट येवढा काही खास कमाल करू शकला नाही.
करणच्या एंगेजमेंटच्या बातमी नंतर त्याच्या पत्नी बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आत्ता सर्वांना लागली आहे.
२ ऑगस्टला सनी देओलचा ‘गदर’ चित्रपट रिलीज होणार असून या चित्रपटात त्याच्या सोबत अमिषा पटेल दिसणार आहे.