तामिळ आणि बॉलिवूडमधील नावाजलेली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ‘तापसी पन्नू’ (Taapsee Pannu). तापसीने तिच्या सौंदर्याने सगळ्यांना घायाळ केले आहे. तापसीच्या सौंदर्याचे जसे चाहते आहेत. तसेच तिच्या अभिनायचे देखील अनेक चाहते आहेत. तिने तिच्या अभिनयाने सगळ्यांवर जादू केली आहे. तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. बॉलिवूडसह टॉलिवूडडमध्ये देखील तिचा चांगलाच दबदबा आहे.
तापसी सध्या चर्चेत येण्याचं कारण असं आहे की, ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तापसी तिचा लाँगटाईम बॉयफ्रेंड ‘मॅथियास बोई’ याच्यासोबत लग्न करणार आहे. मॅथियास हा एक युरोपियन बॅडमिंटनपटू आहे. सध्या तो इंडियामध्ये बॅडमिंटन प्रशिक्षक आहे. तापसी आणि मॅथियास हे दोघे गेल्या १० वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आजपर्यंत कधीच या दोघांनी जगापासून आपलं नात लपवल नाही. तापसी नेहमीच मॅथियाससोबत फोटो शेयर करत असते. मार्चमध्ये हे दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण तापसीने यावर अजून काही भाष्य केले नाही.
नुकतच एका मुलाखती दरम्यान तापसी मॅथियासबद्दल बोलताना दिसून आली. त्यावेळी ती म्हणाली, “राजकुमारला भेटण्याआधी मी अनेक बेडकांना किस केलं आहे. पण, जेव्हा मी मोठी झाली आणि काम करायला सुरुवात केली, तेव्हापासून हा व्यक्ती आहे. कारण तो मुलगा नसून पुरुष आहे. एका पुरुषासोबतच मला सुरक्षित वाटू शकतं, हे मला माहीत आहे. आमच्यात भावनिक नातं आहे. त्यामुळे याचा परिणाम फक्त माझ्यावरच नाही, तर माझं कुटुंब आणि कामावरही होईल. मी माझ्या कामाशी आणि मानसिक स्थितीशी खेळू शकत नाही. म्हणून, एका मुलाबरोबर नाही तर मला पुरुषाबरोबर राहायचं आहे.”
पुढे तिला लग्नाबद्दल विचारलं असता, ती म्हणाली, “कोणालाही त्याच्या आयुष्याबाबत असं विचारणं चुकीचं आहे. जेव्हा मला या गोष्टीची घोषणा करायची असेल, तेव्हाच मी त्याबद्दल बोलेन. तुम्ही याबद्दल बोलला नाहीत तर मला याबद्दल विचार करण्यास वेळ मिळेल. तेव्हाच मी या सर्व गोष्टींबद्दल बोलेन. मी काही बेकायदेशीर करत आहे, असंही नाही. तुम्ही माझ्याकडून लग्नाची अपेक्षा केली नव्हती का? मी माझ्या नात्याबद्दल खूप इमानदार आहे. मी ते लपवलं देखील नाहीये. त्यामुळे जेव्हा हे घडेल. तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल.”
मॅथियास हा तापसी पेक्षा सात वर्षांनी मोठा आहे. आता चाहते देखील या दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.