सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड. २०२३ या वर्षातील ६८वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला आहे.
काही दिवसांपूर्वीच या पुरस्कारासाठीचे नामांकने जाहीर झाली होती. तेव्हा पासूनच यंदाच्या पुरस्कारचे मानकरी कोण ठरणार याचीच वाट सर्वजण पाहत होते. पण काल सर्वांचीच प्रतीक्षा संपली. गुरुवार दिनांक २७ एप्रिल रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला.
यंदाच्या या मानाच्या पुरस्कारावर आलिया भट्ट, राजकुमार राव यांसारख्या अनेक कलाकारांनी आपले नाव कोरले आहे. फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता डेब्यूसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक नाजराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या सिनेमातील प्रमुख भूमिकेत असणारा अभिनेता ‘अंकुश गेडाम’ला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
झुंड या सिनेमात अंकुशने डॉनची भूमिका साकारली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी स्वतः अंकुशची निवड झुंडसाठी केली होती. नागराज मंजुळे यांनी फेसबुकवर अंकुशचा सिनेमातील एक फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीचीही मान उंचावली आहे.
यामुळे त्यांच्या पोस्टवर आणि अभिनेत्यावर संपूर्ण सिनेसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.