बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने आता पर्यंत दिलबर दिलबर, कोका कोला, बद्री कि दुल्हनिया अशी अनेक हिट गाणी दिली आहेत. सध्या नेहाने ९० च्या दशकातील गायिका फाल्गुनी पाठकचे प्रसिद्ध गाणे ‘मैने पायल है छनकाई’ चे रिमेक केले आहे. या गाण्याचं रिमेक व्हर्जन बहुतांश लोकांना आवडलेलं नाही, त्यामुळे नेहाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
मूळ गायिका फाल्गुनी पाठकला देखील हे गाणं आवडलं नाही, तिने याबाबत नेहावर टीका केली आहे. त्यावरून दोघींमधे वाद झाला, त्यांच्यातला वाद काही संपायचं नाव घेत नाही. फाल्गुनी पाठकने नेहा कक्करच्या या गाण्याबद्दल मत व्यक्त केलं आहे, पण गाण्याचे वेगळे व्हर्जन करण्याबद्दल तिचा आक्षेप नसल्याचं सांगत तिने आता या वादातून माघार घेतली आहे.
View this post on Instagram
एका मुलाखतीत नेहाचे नाव न घेता फाल्गुनी म्हणाली की,”एखाद्या गाण्याचं नवीन व्हर्जन करायचं असेल तर तुम्ही नक्की करा पण ते चांगल्याप्रकारे करा. प्रत्येकवेळी रिमेक चांगला होईलच असं नाही, पण तुम्ही प्रयत्न करा की ते गाणं चांगलं होईल. उगाच काहीही करू नका, गाणं खराब कशाला करायचे?”
फाल्गुनीचे ‘मैंने पायल है छनकाई’ हे गाणं अजूनही लोकांच्या पसंती मधील एक म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे ती म्हणाली,” आजही मी जेव्हा ते गाणे गाते तेव्हा मला प्रेक्षकांकडून तितकेच प्रेम मिळते जेवढे पहिल्या दिवशी मिळत होते. प्रेक्षक त्या गाण्याला यमक जुळवून नवीन व्हर्जन तयार करू शकतात. पण त्यांनी ते चांगले केले पाहिजे. गाण्याची सुंदरता आणि त्याचा साधेपणा याला कुठेही धक्का लागता कामा नये.”