आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजेच ‘श्रेया घोषाल’(Shreya Ghoshal). श्रेयाला आताच्या जमान्यातील लता मंगेशकर असं देखील म्हणतात. श्रेयाचे फक्त भारतातच नाही तर, संपूर्ण जगभरात लाखो करोडो चाहते आहेत. २००० साली आलेल्या ‘सा रे गा मा पा’ लिटील चॅम्प्स या कार्यक्रमातून श्रेया जगासमोर आली. तिने या सिझनच्या विजेतेपदाचा मान देखील पटकावला.
पण श्रेयाला खरा ब्रेक मिळाला तो संजय लिला भन्साळी यांच्या आईमुळे, एका संजय यांच्या आई ‘सा रे गा मा पा’ हा कार्यक्रम पाहत होत्या. त्यावेळी त्यांनी श्रेया हिला गाताना पाहिले आणि त्यांनी संजय यांना तिचं नाव सुचवले. त्यावेळी संजय यांनी तिला त्यांच्या ‘देवदास’ या सिनेमात गायची संधी दिली. श्रेयाने या सिनेमातील एक नाही दोन नाही तर तब्बल पाच गाणी गायली. या सिनेमातील तिने गायलेले पहिलं गाणं ‘बैरी पिया’ हे होत. हे गाणे तिने जेष्ठ गायक उदित नारायण यांच्यासोबत गायले होते. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे रियसल करत असताना श्रेयाने डोळे बंद करून एका दमात हे गाणे गायले होते. आणि हेचं गाण संजय यांनी रेकोर्ड करून घेतल आणि सिनेमात देखील हेच गाण वापरण्यात आले. या सिनेमातील श्रेयाने गायलेली सर्व गाणी जवळपास हिट ठरली आणि याचं सिनेमातील गाण्यासाठी श्रेयाला पहिला फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला.
यानंतर श्रेयाचा सुपरहिट गाण्यांचा प्रवास सुरु झाला तो आजही तितक्याच वेगाने सुरु आहे. श्रेयाने आत्तापर्यंत हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती, तेलुगु, कन्नड, आसामी, बंगाली यांसारख्या २० पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तिने आत्तापर्यंत ३००० हून अधिक गाणी गायली आहेत, त्यांपैकी १००० हून अधिक गाणी हिंदी भाषेत गायली आहेत. श्रेया सिनेमातील गाण्यांसोबतच लाईव्ह गाणी देखील गाते. श्रेया जितकी प्रसिध्द आहे, त्याप्रमाणे ती तितकेच जास्त मानधन देखील घेते. श्रेया एका गाण्यासाठी तब्बल २५ लाख रुपये घेते, ती महिन्याला १ कोटीच्या आसपास कमाई करते. श्रेयाला गाण्याप्रमाणेच लक्झरी गाड्यांची देखील प्रचंड आवड आहे. तिच्याकडे बी.एम.डब्ल्यू, मर्सडीज यांसारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत. तिची एकूण संपत्ती ही १८० ते १८५ कोटींच्या घरात आहे. त्यामुळे श्रेया ही बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणारी महिला गायिका आहे.