रश्मिका मंदाना म्हणजे नॅशनल क्रश. रश्मिका कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या फोटोमुळे तर कधी सिनेमांमुळे. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबतचा तिचा पुष्पा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. यातील तिची श्रीवल्ली ही भूमिका प्रचंड गाजली. आणि तिच्या लोकप्रियतेची उंची आणखीनच वाढली.
आता सुद्धा ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी मात्र चर्चा जरा वेगळीच आहे. तेलगू सुपरस्टार विजय देवरकोंडा सोबत तिच्या अफेअरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वीच ते दोघेही डेटवर जाताना दिसले होते.
या वर्षाच्या शेवटी ते दोघेही लग्नबंधनात अडकतील अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. असे असले तरी रश्मिका किंवा विजय यांच्याकडून या गोष्टीला अजूनही दुजोरा मिळालेला नाही. डियर कॉम्रेड आणि गीता गोविंदम या दोन सिनेमांमध्ये ते दोघे एकत्र दिसले होते. त्यांच्या जोडीलाही प्रेक्षकांची चांगलीचं पसंती लाभली होती. अगदी तेव्हापासूनच या दोघांचे अफेअर सुरु आहे अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.
विजय हा अनन्या पांडेसोबत लायगर या सिनेमात प्रेक्षकांना दिसला. तर रश्मिका मंदाना लवकरच अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्यासोबत विकास बहल दिग्दर्शित गुडबाय या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.