बॉलिवूडचा बादशाह म्हणून जगभरात ओळखला जाणारा सर्वांचा लाडका अभिनेता ‘शाहरुख खान.’ सिनेसृष्टीत बादशाहाच्या कारकिर्दीला आता ३१ वर्षे पूर्ण झाली. त्यमुळे जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शाहरुखने १९९२ साली ‘दीवाना’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याचा हा पहिलाच सिनेमा असला तरी तो देखील जबरदस्त हिट झाला होता. त्यानंतर त्याच्या अभिनयाने आणि त्याच्या हटके कलाकृतीने त्याने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. काही वर्षांच्या ब्रेकनंतर त्याने नुकतच प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ या सिनेमातून पुन्हा एकदा धमाकेदार एंट्री केली. त्याचा हा सिनेमा बॉक्सऑफिसवर प्रचंड गाजला.
शाहरुखचा चाहतावर्ग आज देखील पुनःपुन्हा त्याला सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक असतो. काही महिन्यांपासून त्याने आस्क एस.आर.के. (Ask Srk) या सेशन अंतर्गत चाहत्यांसोबत संवाद साधायला सुरुवात केली. शाहरुख आस्क एस.आर.के. मध्ये त्याच्या चाहत्यांना कायम गमतीशीर उत्तरे देत त्यांचे मन जिंकून घेतो.
सिनेसृष्टीत ३१ वर्षे पूर्ण झाल्यामुळे या सेशनमध्ये देखील शाहरुखचे भरभरून कौतुक होत त्याचावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. ३१ वर्षांच्या कारकिर्दीतील त्याचे ब्लॉकबस्टर सिनेमे जसे त्याला आठवले, तसेच त्याच्या चाहत्यांना देखील. शाहरुखच्या एका चाहत्याने ‘दीवाना’ या सिनेमातील ‘कोई न कोई चाहिए’ या गाण्याचा छोटासा व्हिडिओ शेअर करत शाहरुखला विचारले की, “सर या कमाल एंट्रीबद्दल आता काय वाटतं तुम्हाला?” यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला की, ” हेलमेट घालायला हवं होतं.” त्यामुळे आता तो समाजातील एक सुजाण नागरिक म्हणून किती जागरूक आहे हे लक्षात येते.
शाहरुखची एक चाहती म्हणाली की, “सर, मी जुळ्या मुलांची आई होणार आहे. कृपया मला शुभेच्छा द्या आणि माझ्या मुलांची नाव मी ‘पठाण आणि जवान असे ठेवणार आहे. यावर उत्तर देत बादशाह म्हणाला की,”शुभेच्छा… पण बाळांची नावं आणखी काहीतरी छान ठेऊ शकता.” तर त्याच्या आणखी एका चाहत्याने त्याला आणखी एक गहन प्रश्न विचारला की, “पैसा, प्रसिद्धी आणि किंमत यापैकी तू कशाची निवड केली आहेस. यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला की, “आधी किंमत आणि मग बाकीचे दोन्ही.”
त्याने दिलेली दिलखुलास उत्तरे पाहून चाहते त्याच्यावर प्रचंड खुश झाले आहेत. तर आता शाहरुख लवकरच जवान आणि त्यानंतर डंकी या सिनेमात दिसणार आहे.