सध्या मराठी टेलेव्हिजनवर सर्वाधिक चर्चा कसली सुरु आहे ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोची. या शोमधून अनेक कलाकारांनी स्वतःची नवी ओळख निर्माण केली. यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री ‘प्रियदर्शनी इंदलकर.’
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मधूनच प्रियदर्शनी घराघरात पोहोचली. तसेच याच शोमधून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. तिचे सौंदर्य, विनोदबुद्धी आणि तिचा दमदार अभिनयामुळे आज तिने सिनेसृष्टीत स्वतःचे एक भक्कम असे स्थान निर्माण केले आहे. तिचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे.
नुकताच प्रियदर्शनीचा वाढदिवस झाला, त्यामुळे कलाकार मंडळी, तिचे चाहते, कुटुंबीय आणि मित्रपरिवारातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. परंतु वाढदिवशी नक्की असे काय झाले की त्यामुळे तिला सर्वांची माफी मागावी लागली, हा प्रश्न सर्वांच्याच मनात रेंगाळत होता. परंतू तिने स्वतः पोस्ट करत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
प्रियदर्शनीने पोस्ट करत लिहिले की, “मला माफ करा…वाढदिवशी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या पण, मी सर्वांना उत्तर देऊ शकले नाही. माझा संपूर्ण दिवस अतिशय छान गेला. गेल्या वर्षभरात मी अनेक गोष्टी शिकले, नवे लोक, नव्या उपक्रमांमध्ये सहभागी झाले. आता या वर्षात अधिक जबाबदाऱ्या आहेत. मला आशा आहे की, मी तुमच्या सर्व आशीर्वादाने चांगले काम करत राहीन! मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे…पुढच्या वर्षाची मी वाट पाहिन.”
प्रियदर्शनी नुकतीच ‘फुलराणी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिचा हा सिनेमा २२ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. त्यामुळे प्रियदर्शनीला पुन्हा एकदा सिनेमामध्ये काम करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.