सध्याच्या धावपळीच्या जगात मनोरंजन क्षेत्राचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्र म्हणटले की आपसूकच आठवण येते ती मालिका, सिनेमा आणि वेबसिरीजची. पण ते पाहण्यासाठी प्रेक्षकांना नेहमीच सवड असते असे नाही. त्यामुळे सध्या थिएटर एवढीच डिमांड ओटीटी प्लॅटफॉर्मला आली आहे.
खास करून कोरोनाच्या काळापासूनच भारतामध्ये ओटीटीचा पुरेपूर वापर सुरू झाला आहे. त्यामुळे एका मागोमाग एक अनेक नवनवीन ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू झाले आहेत. यामध्ये अंबानी यांच्या जिओने देखील पाऊल टाकले आहे. मागील काही महिन्यांपासूनच जिओच्या नवीन प्लॅटफॉर्मची चर्चा सुरू होती. अखेर आता प्रतिक्षा संपली आहे.
जिओने त्यांच्या प्रेक्षकांना यंदाची आयपीएल एकदम फ्रीमध्ये दाखवली त्यामुळे प्रेक्षकांना न चुकता ‘जिओ सिनेमा‘ हा ॲप डाउनलोड करावाच लागला. परंतू आता याच ॲपच्या प्रीमियमसाठी प्रेक्षकांना चांगलीच रक्कम मोजावी लागणार आहे. कारण जिओ सिनेमाचे नवे प्लॅन नुकतेच जाहीर झाले आहेत.
Jio Fooling Us 🤡
Warner brothers Some of the Important Movies are Not Available On JioCinema 🚶♂️🚶♂️🚶♂️(Man of Steel, Aquaman, Matrix Etc.)
Don't Waste Your Money 👍✅#JioCinema #HBO #JiocinemaPremium pic.twitter.com/4fY9Xf9gvJ
— 𝙅𝘼𝘾𝙆 ™ (@itz_Chris_of) May 14, 2023
‘डिस्नी प्लस हॉटस्टार’ सोबतचा ‘HBO’ने केलेला करार संपल्यानंतर त्यांच्या या सगळ्या वेबसिरीज आणि सिनेमे जिओ प्लॅटफॉर्मवर दाखवणार असल्याची चर्चा सुरु होती. पण आज यावर शिक्कमोर्तब झाला. आयपीएल नंतर जिओ प्लॅटफॉर्मवर HBO आणि WB (Warner Bros) या दोन्ही हॉलिवूड स्टुडिओजचे सिनेमे आणि वेबसीरिजही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. यासाठी जिओ प्रीमियमचा एक वेगळा प्लॅन त्यांनी लॉंच केला आहे. वर्षाला ९९९ रुपये किंमत मोजून प्रेक्षकांना हा प्लॅन विकत घेता येणार आहे. याबरोबरच ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सगळा कंटेंट देखील पाहायला मिळणार आहे.
जिओ सिनेमाच्या या नवीन प्लॅटफॉर्मवर ९९९ रुपये भरूनही अनेक सिनेमे आणि वेबसिरीज दिसत नसल्याची खंत प्रेक्षकांनी व्यक्त केली. तर काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावर जिओला टॅग करत “जिओ आपल्याला मूर्ख बनवत आहे”असे मत मांडले आहे. त्यावर “ही सुरुवात असल्याने येणाऱ्या काळात आणखी चित्रपट आणि वेबसिरीज जिओ प्रेक्षकांसाठी घेऊन येईल.” असे जिओकडून सांगण्यात आले आहे.