बॉलिवुडमध्ये बबली या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच अमृता सिंह. तिने बॉलिवुडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या दमदार अभिनयाने तिने बॉलिवुडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख बनवली होती. तिचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. ती तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते.
जेव्हा अभिनेत्री तिच्या करियरच्या शिखरावर होती, तेव्हा ती तिच्यापेक्षा १२ वर्षानी लहान असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती. हा अभिनेता म्हणजेच बॉलिवुड स्टार सैफ अली खान आहे. त्या दोघांनी लग्न देखील केले. त्यांना सारा व इब्राहिम ही दोन मुले आहेत. पण काही वर्षानी दोघांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटचे कारण म्हणजे त्यांच्यात रोज भांडण होऊ लागले. रोजच्या भांडनांना कंटाळून सैफ आणि अमृताने २००४ मध्ये एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर ती तिच्या दोन मुलांसह नवीन घरात शिफ्ट झाली. हे सर्व झाल्यानंतर सैफच्या आयुष्यात बॉलिवुडची टॉपची अभिनेत्री करीनाने एंट्री केली. २००७ मध्ये करीना आणि सैफ यांच्या अफेअर्सच्या चर्चा होऊ लागल्या. ते दोघे एकमेंकासोबत वेळ घालवताना दिसू लागले. या नंतर सैफ आणि करीनाने २०१२ मध्ये लग्न केले. त्यांच्या या नात्यामुळे अमृता सिंग संताप व्यक्त करत असल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु असे काहीही नाही असे स्वतः अमृताने सांगितले. सैफ आणि करीनाच्या नात्यामुळे मला कधीच अडचण आली नाही, असे अमृता म्हणाली होती. जर असे असते तर मी सैफच्या दुसऱ्या लग्नासाठी आमच्या मुलांना कधीही तयार केले नसते.
असे असूनही करीना व अमृताने आज पर्यंत कोणत्याही मुलाखतीमध्ये एकमेंकाविरुद्ध अपशब्द वापरला नाही. जरी त्या दोघी एकमेकांशी बोलत नसल्या तरी त्यांच्यात कधीही मतभेद झाले नाहीत. येवढंच नाही तर अमृता सिंह ची दोन्ही मुलं करीनाचा आदर करतात. ते करीना व तिच्या मुलांच्या ही खूप जवळ आहेत. तसेच त्यांची बॉंडिंग देखील खूप चांगली आहे.