बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत असते. प्रभास आणि क्रिती सेनॉन यांनी सध्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटाच्या सेटवरच क्रिती आणि प्रभासमध्ये जवळीकता निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. आता क्रिती आणि प्रभास यांची सर्वत्र चर्चा रंगली आहे. यांच्या नात्याविषयी क्रितीचा जवळचा मित्र आणि अभिनेता वरुण धवन याने मोठी हिंट दिली आहे. तसेच क्रितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत असंही बोललं जात होतं. ‘आदिपुरुष’ टीझर लॉन्चच्या वेळी त्यांची केमिस्ट्री आणि त्यांच्यातला बाँड पाहून ते खरोखर एकमेकांना डेट करत आहेत असंच त्यांच्या चाहत्यांना वाटलं. पण आता क्रितीच्या एका वाक्याने सर्वांचं लक्ष त्यांच्या नात्याकडे वेधलं गेलं आहे.
क्रिती सेनॉन आणि वरुण धवन यांचा ‘भेडिया’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. क्रिती सेनॉन गेले काही दिवस ‘भेडिया’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त होती. विविध शहरांमध्ये, कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावत त्यांनी या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. या मुलाखतीत तिने तिचा ‘आदिपुरुष’मधील सहकलाकर प्रभासशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. क्रिती म्हणाली की, “जर मला संधी मिळाली तर मी प्रभासशी लग्न करेन.” त्यासोबतच ‘आदिपुरुष’च्या शूटिंगच्या वेळी प्रभास क्रितीचा तेलुगूचा शिक्षक बनला होता असंही क्रितीने सांगितलं. आता क्रितीच्या या वाक्याने सर्वजण आवाक् झाले असून तिचं हे विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. क्रितीच्या या बोलण्याने आता पुन्हा एकदा प्रभास आणि क्रिती ट्विटरवर ट्रेंड होत आहेत. त्यामुळे आता ती दोघं खरोखर एकमेकांना डेट करत आहेत असं त्यांच्या चाहत्यांना वाटू लागलं आहे.
‘भेडिया’ च्या प्रमोशनदरम्यान या व्हिडिओमध्ये वरुणला ‘क्रितीला कोणासोबत पाहायला आवडेल?’ असं विचारलं तेव्हा तो म्हणाला कि, ”क्रितीच्या आयुष्यात तिचा ‘शेहजादा’ आला आहे’ असं म्हणत त्याने आधी कार्तिक आर्यनचं नाव घेतलं पण नंतर हळूच प्रभास सोबत तिची जोडी चांगली दिसेल’ असं म्हणाला. आता या व्हिडिओनंतर चाहते या दोघांच्या नात्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आतुर झाले आहेत.
दरम्यान, क्रिती आणि प्रभासच्या नात्याविषयी बोललं जात होतं की, आदिपुरुषच्या सेटवर या दोघांमध्ये पहिल्याच दिवसापासून फार छान बॉंडिंग झालं आहे. प्रभास फारच लाजरा आहे तो आपल्या सह-अभिनेत्रींशी फारसं बोलत नाही. परंतु प्रभास क्रितीच्या फारच जवळ आल्याचं म्हटलं जात आहे. हे दोघे सेटवर बराच वेळ सोबत घालवत होते असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. शिवाय शूटिंग संपल्यानंतरही हे दोघे संपर्कात आहेत.
प्रभासचे नाव याआधी बाहुबली स्टार अनुष्का शेट्टीसोबत जोडले गेले होते. मात्र, दोघेही नेहमी ‘फक्त मित्र’ असल्याचे सांगत आहेत. परंतु क्रिती सोबतच्या चर्चांना आलेलं उधाण पाहून आता हे दोघे खरंच रिलेशनशिप मध्ये आहेत का? हे येणार काळच सांगेल.