सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शोभिता धुलिपाला आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २०१३ मध्ये मिस इंडिया होऊन शोभिताने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.
तर या मिस इंडियाने अनेक सिनेमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यापैकी मणिरत्नम यांच्या पीएसच्या दोन्ही भागांमध्ये शोभिताचा अभिनय वाखण्याजोगा होता. त्यासाठी तिचे भरभरून कौतुकही झाले. तर शोभिता साऊथचा हिरो आणि नागार्जूनचा मुलगा टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्याची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा रंगली आहे.
आत्तापर्यंत शिल्पा शेट्टी, मलायका, मल्लिका, तब्बू, तनुश्री दत्ता यांनी त्यांना बॉलिवूडमध्ये कशाप्रकारे वेगवेगळ्या संघर्षाचा सामना करावा लागला हे फार उघडपणे मांडले आहे. तर आता या अभिनेत्रींच्या यादीत आता शोभिताच्या नावाची देखील भर पडली आहे.
हे देखील वाचा : आत्ताच्या सिनेमांप्रमाणे ‘हम आपके हैं कौन’ सिनेमा देखील या कारणामुळे प्रदर्शनानंतर बदलण्यात आला होता.
शोभिता म्हणाली की, “तू गोरी नाहीस असे मला कित्येक ऑडिशनमध्ये ऐकावे लागले आहे. याविषयी मी काय बोलू, अजूनही आपल्याकडे रंगाविषयी खूप सारे समज आहेत. त्याच्या आधारावर जर निवड होणार असेल तर मग आणखी काय बोलायचे.” असे म्हणत तिने खंत व्यक्त केली.
परंतू या सर्व काळात अनुराग कश्यप या दिग्दर्शकाने तिला खूप मोठा आधार दिला असे तिने सांगितले.