सध्याच्या घडीचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूरचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. तो नुकताच त्याच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या सिनेमामध्ये दिसला. त्याचा हा सिनेमा ८ मार्च रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती लव्ह रंजन यांनी केले.
तू झूठी मैं मक्कार या सिनेमामध्ये रणबीरसोबत श्रध्दा कपूर देखील मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्या दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे, तेही योगायोगाने. कारण सिनेमासाठी श्रध्दाला नसून तर दुसऱ्या अभिनेत्रीला या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. ती अभिनेत्री म्हणजे रणबीरची एक्स गर्लफ्रेंड.
रणबीर जेवढा त्याच्या कामामुळे चर्चेत असतो तेवढाच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत आणि त्याच्या चाहत्यांमध्ये देखील त्याच्या लव्ह लाइफ बद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. रणबीरची एक्स गर्लफ्रेंडने नकार दिल्यामुळे ही भूमिका श्रद्धाच्या वाट्याला आली.
या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी सर्वात आधी दीपिका पादुकोणला विचारण्यात आले होते मात्र तिने या सिनेमाला नकार दिला. यामागचे कारण म्हणजे सिनेमाच्या दिग्दर्शकावर ‘मी २’चे आरोप करण्यात आले होते म्हणून दीपिकाने नकार दिला होता.