बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूजने मॉडेलिंगमधून सिने सृष्टीत पदार्पण केले. इलियानाने आजवर अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. तसेच तिने तमिळ सिनेमांत देखील काम केले आहे. पण आता तिची कितीही इच्छा असली तरी तिच्या काही इच्छांवर तिला आळा घालावा लागणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
इलियाना तिच्या कामामुळे जेवढी चर्चेत असते त्याहून अधिक ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आतापर्यंत अनेकदा तिचं नाव कतरिना कैफच्या भावासोबत जोडले गेले. परंतू त्यावर कोणाकडून ही अधिकृतरित्या घोषणा झाली नाही. पण आता तिची होणारी चर्चा पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत.
कारण इलियानाला साऊथ इंडस्ट्रीने आता नो एंट्री चा इशारा दिला आहे अशा चर्चा सध्या सुरू आहेत. इलियानाला तमिळ फिल्म इंडस्ट्रीने बॅन केले ही माहिती वाऱ्यासारखी पसरत आहे. इंडस्ट्रीतून बेदखल करण्यामागचे कारण म्हणजे इलियानाचे अव्यवसायिक वर्तवणुक.
आतापर्यंत काही फिल्म प्रोड्यूसर्सकडून सिनेमाचे अॅडवान्स पैसे घेऊन त्या सिनेमाच्या शूटसाठी मात्र तिने नकार दिला. त्यामुळे प्रोड्यूसर्सचे खूप मोठे नुकसान झाले आहे. म्हणून आता तमिळ इंडस्ट्रीत तिला बॅन करण्याची आणखीनच दाट शक्यता वर्तवली जात आहे.
परंतू याबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. किंवा स्वतः इलियानाने ही यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. पण सोशल मीडिया आणि सिनेसृष्टीत या चर्चांना उधाण आले आहे.