‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून प्रेक्षकांन समोर आलेला सर्वांचा लाडका मराठमोळा अभिनेता म्हणजेच अंकुश चौधरी. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात त्याने शाहीर साबळे यांची भूमिका साकारून त्यांना पडद्यावर जिवंत केल आहे. अत्यंत दमदार अभिनयाने त्याने हि भूमिका साकारली आहे. तो नेहमीच त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलस करत असतो.
अॅक्शन चित्रपट असो किंवा रोमँटिक तो प्रत्येक भूमिकेत शोभून दिसतो. त्याने ‘डबल सीट’, ‘दगडी चाळ’, ‘ती सध्या काय करते’, ‘धुरळा’, ‘दुनियादारी’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. तसेच तारुण्याच्या बाबतीत बोलायचं झाल तर तो आत्ताच्या अभिनेत्यांना चांगलीच टक्कर देतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती असत. तसेच अंकुश सुद्धा एका बॉलिवूड अभिनेत्रीवर फिदा आहे.
चित्रपटामध्ये पदार्पण केल्यापासूनच त्याची पर्स्नालीटी पाहून लाखो तरुणी त्याच्या प्रेमात वेड्या आहेत. उंच, हँड्सम आणि देखण्या अभिनेत्याची तरुणींवरील जादू अजूनही कमी झालेली नाही. तो जरी मराठी अभीनेता असला तरी त्यांची आवडती अभिनेत्री ही मराठी नसून बॉलिवूडची अभिनेत्री आहे. अंकुशने सकाळ डिजिटलच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्याने सांगितले की, त्याला लहानपणा पासूनच मधुबाला खूप आवडायची.
View this post on Instagram
त्याच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल बोलताना अंकुश म्हणाला, ‘मी जितके चित्रपट केले आहेत, ज्या अभिनेत्रीसोबत मी काम केलं, त्या सर्वच अभिनेत्री खुप कमाल आहेत. त्यांचा अभिनय असो स्वभाव असो सगळचं खुप छान होतं. पण क्रशबद्दल सांगायचं तर लहानपणापासून मला मधुबाला खुप आवडायची. त्या आजही मला आवडतात. त्यानंतर मी असा विचार केला नाही की मला क्रश वैगरे कोणी आवडेल नाही.’ त्याचं हे उत्तर सगळ्यांनाच अनपेक्षित होतं. त्याची ही मुलाखत आता चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.
अंकुश चौधरीची बायको दीपा परब देखील उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने सुद्धा अनेक मराठी मालिका, चित्रपट, नाटक तसेच ती हिंदी मालिकांमध्ये देखील काम करताना दिसली आहे. सध्या ती झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत दिसतेय.