वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ छोट्या पडद्यावरील ही मालिका गेल्या १५ वर्षांपासून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावी अशी ही मालिका.
मागील काही वर्षांत या मालिकेत बरेच बदल झालेले दिसले. तरी सुद्धा या मालिकेचे वेड मात्र प्रेक्षवर्गात कमी झालेले नाही. त्यामुळे मालिकेवर प्रचंड प्रेम करणारे चाहते देखील मालिकेकडून अपेक्षा ठेवू लागले आहेत. मागील काही वर्षांपासून सर्वचजण दयाबेन परतण्याची वाट बघत आहेत. तर काहीजण टप्पू आणि सोनूची लव्ह स्टोरी पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या पुढील भागाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे प्रोमोनुसर आगामी भागात टप्पू सोनूला प्रपोज करणार आहे. पण सोनूने उत्तर द्यायच्या आतच तिथे भिडे येऊन सर्वकाही थांबवतो आणि त्या दोघांना जेठालालच्या घरी घेऊन जातो.
View this post on Instagram
हे नातं भिडेला मान्य नसल्यामुळे त्याला टप्पूचा राग आल्यामुळे त्याला बापूजी आणि जेठालालच्या समोर हाजिर करतो. पण दुसरीकडे जेठालाल व बापूजी मात्र भिडेला हैराण होऊन टप्पूला पाठींबा देतात. त्यामुळे यांची ही प्रेमकहाणी पुढे काय वळण घेते, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
प्रोमो पाहून अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कमेंट करत अनेकांनी लिहिले की, “नेहमीप्रमाणे आतादेखील भिडे स्वप्न बघत असेल.” तर दुसरीकडे काहींना असे वाटत आहे की मालिकेचा टीआरपी कमी झाल्याने निर्मात्यांनी हा ट्वीस्ट आणला आहे.
त्यामुळे पुढे काय होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागले आहे.