‘प्रेमम’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्राला सुरुवात करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून तिचे चित्रपट पाहण्यासाठी सर्वेजण उत्सुक असतात. आत्तापर्यंतच्या तिच्या प्रेमम, मारी व काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला सिनेमा गार्गी आणि श्याम सिंग रॉय या सगळ्याच सिनेमांवर चाहत्यांनी प्रचंड प्रेम केले. साई पल्लवी तिच्या अभिनयामुळे साऊथ इंडस्ट्रीमधेच नाही तर बॉलिवूडसह संपूर्ण मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
कोणत्याही चित्रपटामध्ये साई पल्लवी बिना मेकअप काम करताना प्रेक्षकांना दिसून येते. तिने अभिनयाच्या जोरावर अनेक प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला आहे. आपल्या जबरदस्त अदा व हटके अंदाजाने अनेकांना आपल्या प्रेमात पाडणाऱ्या साईची प्रेम कहाणी काही वेगळीच आहे. ती फक्त अभिनेत्रीच नसून एक प्रसिद्ध डॉक्टर देखील आहे.
‘माय व्हिलेज’ या शोमध्ये साईने तिच्या प्रेमकहाणीबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. तिने सांगितले की घरातल्यांनी तिने लिहिलेले प्रेमपत्र त्यांच्या लहानपणीच पकडले गेले होते. अभिनेत्रीने ते प्रेमपत्र एका मुलासाठी लिहिले होते. पण, त्यांना त्याच्या कुटुंबीयांनी रंगेहात पकडले आणि त्यांची धुलाई केली. तिच्या बालपणीची गोष्ट आठवत साईने सांगितले की, “जेव्हा ती सातवीला शिकत होती, त्यावेळी तिने एका मुलासाठी प्रेमपत्र लिहिले होते. मात्र तिच्या घरच्यांनी तिला पकडले होते. यानंतर तिला बेदम मारही खावा लागला होता”.
साईने पहिल्यांदाच तिच्या खासगी आयुष्यातील या घटनेचा खुलासा केला आहे.