मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड, ब्युटिफुल आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईचा आज वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरांतून आज तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तसेच सईचा दौलतराव म्हणजेच तिचा बॉयफ्रेंड अनिश जोग याने सुद्धा सईच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. सई आणि अनिश सध्या दोघेही एकत्र परदेशात फिरायला गेले आहेत. खरे म्हणजे सईने आतापर्यंत तिच्या एकटीचेच फोटो शेअर केले. त्यावरून ते दोघे एकत्र नसल्याचे तिने दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतू ते दोघेही स्वतःचेच फोटो त्याच लोकेशनवरील टाकत असल्यामुळे नेटकर्यांना ते दोघे एकत्र असल्याची खात्री पटली होती.
View this post on Instagram
मागील दोन वर्ष सईच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन आले आहे हे नक्की. हा आनंद तिच्या खासगी आयुष्यातच नाही तर करियरमधील कारकिर्दीतील ही आहे. त्यामुळे तिचा हा वाढदिवस आणखीनच खास आहे हे नक्की. हा बर्थडे आणखीन स्पेशल करण्यासाठी सई आणि अनिश स्पेनला पोहोचले आहेत.
तर तेथे मौज मजा करत असलेल्या त्यांच्या फोटोचा एक खास व्हिडिओ बनवत आज सईच्या वाढदिवसानिमित्त अनिशने शेअर केला आहे. तर हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शन मध्ये लिहिले की, “दिल कह रहा है उसे…” तसेच या व्हिडिओत अनिशने सईचे खूपच खास असे काही फोटो शेअर केले, यात तिचा बिनधास्त अंदाज देखील पाहायला मिळत आहे.
अनिश जोग हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय निर्माता असून त्यानं धुरळा, व्हायझेड, गर्लफ्रेंड, मुरंबा, टाइम प्लीज या सिनेमांच्या निर्मितीचे काम केले आहे. त्यामुळे त्याचा देखील चांगलाच चाहतावर्ग आहे. सई आणि अनिश गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सईने गेल्या वर्षी एक फोटो शेअर करत ती पुन्हा प्रेमात पडल्याची आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली.
अनिशने शेअर केलेल्या व्हिडिओवर देखील लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.